आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Surjewala Said Given Political Power At A Young Age, Made An MP At The Age Of 26, Gave A Ministerial Post At The Age Of 32, What Did The Congress Not Give To Sachin Pilot?

सचिन पायलट यांची उचलबांगडी:सुरजेवाला म्हणाले - कमी वयात दिली राजकीय ताकद, वयाच्या 26 व्यावर्षी खासदार केलं, 32 व्या वर्षी मंत्रीपद दिलं, सचिन पायलट यांना काँग्रेसने काय दिले नाही? 

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसची सचिन पायलटविरोधात कडक कारवाई, उपमुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले

सचिन पायलट यांना कॉंग्रेस विरोधात बंडखोरी केल्याचा परिणाम भोगावा लागला आहे. त्यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी याची घोषणा केली. पायटल यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देताना सुरजेवाला यांनी लहान वयातच सचिन पायलट यांना पक्षाने बरेच काही दिल्याचे स्पष्ट केले.

जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काही आमदार व मंत्री यांनी कॉंग्रेसचे सरकार उद्ध्वस्त करून भाजपच्या कटात सामील झाले या गोष्टीचे आम्हाला वाईट वाटते.'

सुरजेवाला पुढे म्हणाले, 'राहुल गांधींच्या नेतृत्वात सोनिया गांधी जी सतत सचिन पायलट आणि अन्य सहकारी मंत्री, आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिले. कॉंग्रेस हाय कमांडने सचिन पायलटशी वारंवार चर्चा केली. सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनी पायलटशी 10-12 वेळा बातचित केली. केसी वेणुगोपाल अनेक वेळा बोलले. सोनियाजी आणि राहुल जी यांच्या वतीने आम्ही सर्व दरवाजे खुले असल्याचे आवाहनही केले. जर आपल्यात मतभेद असतील तर कॉंग्रेस नेतृत्वाला सांगा, आम्ही बसून सोडवू.'

कमी वयात दिली राजकीय शक्ती

रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांना कॉंग्रेसमध्ये देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'सचिन पायलट यांना तरुण वयात दिलेली राजकीय शक्ती बहुदा कुणाला दिली नव्हती. 2003 मध्ये सचिन पायलट यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी 2004 मध्ये त्यांना कॉंग्रेसने खासदार केले. वयाच्या 32 व्या वर्षी केंद्रात मंत्री केले. वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांचे वैयक्तिक आशीर्वाद त्यांच्यासोबत होते, म्हणूनच त्यांना बरेच काही दिले गेले.'

या सर्व गोष्टी सांगत रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, 'बरेच काही मिळूनही सचिन पायलट यांनी कॉंग्रेसचे सरकार पाडण्याच्या षडयंत्रात भाग घेतला, हे सहन केले जाऊ शकत नाही. म्हणूनच सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'