आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतिहासकारांच्या दाव्यानुसार औरंगजेबाने मंदिर तोडून मशीद बांधली होती इतिहासकार आंद्रे ट्रस्की यांच्या ‘औरंगजेब : द मॅन अँड मिथ’ पुस्तकात लिहिले की- ज्ञानवापी मशीद औरंगजेब कालखंडाच्या आधी बांधली आहे. ती कुणी बांधली ते माहीत नाही. मात्र, औरंगजेबाने मंदिरे तोडण्याचे आदेश दिले होते, तेव्हा जुना विश्वनाथ मंदिराचा ढाचा मशिदीसोबत जोडला होता.
कॅथरीन एसर यांनी आपले पुस्तक ‘आर्किटेक्चर ऑफ मुघल इंडिया’त लिहिले- मोगलांनी काशीत राजा मानसिंहांने बांधलेले प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते. विशेषत: मंदिरांच्या संरक्षकांना, हिंदूंना धडा शिकवता यावा यासाठी ते केले. कारण, हे लोक शिवाजीराजेंचे समर्थन करतात,असा त्यांना संशय होता.
२१ वर्षांपासून प्रकरण कोर्टात: १९९१ मध्ये अनेक स्थानिक पुजारी वाराणसी कोर्टात गेले आणि १६६९ मध्ये मोगल सम्राट औरंगजेबच्या आदेशाने काशी विश्वनाथ मंदिर नष्ट करून ज्ञानवापी मशीद स्थापन केल्याचा दावा केला होता. त्यानंतर प्रकरण थंड बस्त्यात गेेले. नंतर २०१९ मध्ये राम मंदिराच्या निकालानंतर हे प्रकरण तापले.
१९३७ च्या आदेशानुसार न्यायालयात आव्हान देणार
न्यायालयाच्या १९३७ च्या आदेशानुसार, वक्फच्या जमिनीवर अशा पद्धतीचा सर्व्हे आणि व्हिडिओग्राफी केली जाऊ शकत नाही, असा मुस्लिम पक्षाचा दावा आहे. विरोधी पक्षाचे वकील अभयनाथ यादव म्हणाले, ज्या भूखंड क्रमांबाबत बोलले जात आहे, तो या ठिकाणी अस्तित्वातच नाही.
ताजमहाल : कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले, म्हटले- जनहित याचिकेचा असा दुरुपयोग करू नका
ताजमहालच्या बंद २२ खोल्यांचे दरवाजे उघडण्याच्या मागणीवर कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले. न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय म्हणाले की, याचिकाकर्त्याने जनहित याचिका व्यवस्थेचा दुरुपयोग करू नये. आधी विद्यापीठात जा, पीएच. डी. करा, नंतर आमच्याकडे या. उद्या तुम्ही याल आणि न्यायाधीशांच्या चेम्बरमध्ये जायचे आहे असे म्हणाल. मग आम्ही तुम्हाला आमचे चेम्बर दाखवायचे का? तुम्ही म्हणता तसा इतिहास शिकवला जाणार नाही.
मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी : हायकोर्टाने म्हटले, चार महिन्यांच्या आतच सर्व याचिकांचा निपटारा करा
अलाहाबाद हायकोर्टात कृष्ण जन्मभूमी-ईदगाह प्रकरणाची सुनावणी झाली. सर्व याचिकांचा ४ महिन्यांत निपटारा करा, असे निर्दश कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला दिले. याची रोज सुनावणी करावी, अशी मागणी हिंदू पक्षकाराने केली होती. लखनऊच्या रंजना अग्निहोत्री यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जमिनीच्या मालकीच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. तीत श्रीकृष्ण जन्मभूमीतील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.