आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनमध्ये शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत, परंतु अद्याप या उपक्रमास यश आले नाही. देशभरात सीबीएसईच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या 6 हजार विद्यार्थी आणि शिक्षकांवर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली. रिपोर्टनुसार, 90.6% विद्यार्थ्यांना शाळेतच शिकायला आवडते. सध्या 78.3% विद्यार्थी स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या फोनवरून किंवा व्हॉट्सअॅपद्वारे अभ्यास करत आहेत. 8.7% गूगल क्लास रूम आणि इतर माध्यमातून अभ्यासाचे धडे घेत आहेत. 37.5% मुलांना शाळेतील अभ्यास घरी करायला आवडतो.
राष्ट्रीय पातळीवरील मुलांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार समूहामार्फत हा सर्वेक्षण अहवाल करण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रातील विशेषज्ञ यामध्ये सहभागी आहेत. घरी ऑनलाइन अभ्यास करणे सोपे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होत नाहीत. एक मोठा गट ऑनलाइन शिक्षणापासून अद्याप दूर आहे.
काही कौतुकास्पद प्रयत्न, परंतु अद्याप अपुरा
सरकार खासगी टीव्ही वाहिन्यांना सबसिडी देऊ शकतील का? जेणेकरून फ्री टू एअर वेळ देऊ शकतील असा प्रश्न सल्लागारांनी विचारला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना टीव्हीवरील बॉलीवूड कलाकार, संगीतकार, साहित्यिक, क्रीडापटू, वैज्ञानिक आणि लेखक यांच्याशी थेट संवाद साधू द्या, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी तणावमुक्त शिकू शकेल. जेथे वीज आणि इंटरनेटची सुविधा नाही तेथे अधिक समस्या आहेत. ऑनलाईन प्रसारित किंवा रेडिओ-टीव्हीद्वारे शिक्षण हा एक-मार्ग संवाद आहे.
मुले नैतिक शिक्षण, ज्ञान आणि मनोरंजनपासून दूर झाले
रिपोर्टमध्ये म्हटले की, विद्यार्थ्यांना मित्रांची आठवण येत आहे. शाळेत नैतिक शिक्षण, ज्ञान आणि मनोरंजन मिळते, ते आता मिळत नाहीये. मानव संसाधन विकास मंत्रालय, सीबीएसई, एनसीईआरटी आणि इतर शैक्षणिक संस्था यासाठी अधिक चांगले प्रयत्न करीत आहेत.
हेल्पलाइन आणि सल्लागार ठेवा
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांच्या नेतृत्वात सीबीएसईने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800118002 आणि 1800118004 सुरू केले आहेत. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक या समस्येवर सल्ला घेण्यासाठी या नंबरवर कॉल करू शकतात.
ऑनलाइन शिक्षणाचे काही उलट परिणाम
विद्यार्थी काही नवीन करण्यास असमर्थ आहेत, शालेय काम अधिक आहे. त्यांना याचा कंटाळा येत आहे. खेळू शकत नाही. चिडचिडेपणा, राग, भीती, एकटेपणा, जास्त भूक किंवा अजिबात भावना नसणे, जास्त प्रमाणात झोप येणे किंवा झोपेची कमतरता यासारख्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.