आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुशांत सिंह हत्या प्रकरणात राज्याचे प्रमुख नेत्याचे नाव आहे. रिया चक्रवर्तीला एयू चे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे अशी मागणी आज लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
रियाला सुशांतच्या आधी 44 काॅल्स! - शेवाळे
लोकसभेत निवेदन करताना राहुल शेवाळे म्हणाले, रिया चक्रवतीच्या मोबाईलची पडताळणी केली आणि त्यात महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याचे अर्थात 'ए यू'चे नाव आले हे खरे आहे का? रिया चक्रवर्तीला सुशांतच्या आधी 44 काॅल्स ए यु चे आले होते. एयु म्हणजे लीगल अन्यया उद्धव म्हणतात परंतु, बिहार पोलिसांनी तपास केला तेव्हा आदित्य उद्धव. आदित्य उद्धव ठाकरे हे नाव आले होते.
'एयू'चा विषय गंभीर
राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले, एयू म्हणजे अनन्या उद्धव नसून आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांच्या तपास सांगतो. याउलट मुंबई पोलिसांचा तपास वेगळा आहे. सीबीआयचा लोकांच्या मनात प्रश्न आहे. त्यांना सत्यता जाणून घ्यायची आहे.
खरं काय लोकांपर्यंत पोहचावे
राहुल शेवाळे म्हणाले, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या तपासाचा कुठलाही खुलासा केला नाही. सीबीआयने याबाबत कुठलीही माहीती आलेली नाही. त्यामुळे याबाबतची सत्यता जनतेला समजावी यासाठी मी गृहमंत्र्यांना मी निवेदन दिले आहे. सुशांतच्या केसबाबतची खरी माहीती समोर यायला हवे.
तपासात तफावत
राहुल शेवाळे म्हणाले, तीन प्रकारे तपास झाला. तिघांमध्ये वेगळी तफावत आढळते. मुंबई पोलिस, बिहार पोलिस आणि सीबीआयचा रिपोर्ट माझ्या माहीतीप्रमाणे आला नाही त्यामुळे या प्रकरणाची सतत्या समोर यावी. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात सहभाग आहे का यावर ते म्हणाले की, एयू बाबत माहीती लोकांना द्यायला हवे. एयू कोण आहे आदित्य उद्धव ठाकरे की, अनन्या उद्धव आहे याचा खुलासा समोर यायला हवा. केंद्रीय गृहमंत्री याबाबत महत्वाची भुमिका घेऊ शकतात. मुंबई पोलिसांनी माहीती लपवल्याचा आरोपही त्यांनी केला.
आदित्य ठाकरेंना ओळखत नाही - रिया चक्रवर्तीचा खुलासा
सुशांतच्या प्रकरणाचे राजकारण होत असल्याचे रियाच्या वकिलांनी म्हटले होते. रिया आणि माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीबद्दल चर्चांवर वकिलांनी स्पष्ट केले होते की, रिया आणि आदित्य ठाकरे दोघे कधीही भेटले नाही. रियाला शिवसेनेच्या नेत्यांबद्दल फक्त ऐकीव माहिती आहे. पण ती आदित्य ठाकरे यांना कधीही भेटली नाही. अनेक राजकीय नेते याचा गैरफायदा उचलू पाहत आहेत. या विषयात राजकारण होत आहे.
आरोप निरर्थक - रियाचे स्टेटमेंट
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. आता रियाने वकिलांच्या माध्यमातून स्वतःचे म्हणणे स्पष्ट केले. रियाच्या वकिलांनी स्पष्ट केले होते की, की रिया विरोधात पोलिस आणि ईडीच्या चौकशीत काहीही मिळाले नाही. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबियांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणतंही तथ्य नसून मनाला येईल तसे आरोप ते करत आहेत.
बिहार पोलिसांचा एफआयआर राजकीयदृष्टीने
बिहार पोलिसांचे एफआयआर पूर्णपणे राजकीयदृष्टीने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे रिया बेकायदेशीर तपासणीचा भाग होऊ शकत नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासणीत ती सहकार्य करत आहे. मुंबई पोलिस आणि ईडी या दोघांनाही रियाची सर्व आर्थिक कागदपत्रं सोपविण्यात आली आहेत. या कागदपत्रातून तिच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट करतात.
एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही
रियाच्या खात्यांसह इनकम टॅक्स रिटर्नची तपासणी ईडीने केली आहे. या तपासणीत त्यांना रियाविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही. रियाने सुशांतच्या खात्यातून एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही. त्याच्या सर्व इनकम टॅक्स रिटर्न्सची चौकशी पोलिस आणि ईडीने केली आहे. रिया आणि सुशांतच्या कुटुंबियांचे संबंध आधीपासूनच चांगले नव्हते. रियाच्या स्टेटमेन्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, रियाला या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी याबाबत कोणतीही अडचण नाही.
हेही वाचा
दिशा सालियानचा मृत्यू हा अपघातीच:सीबीआयचा अहवाल, तोल गेल्याने 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबाआयने गत महिन्यात मोठा खुलासा केला. दिशा सालीयन हिचा मृत्यू हा अपघातीच होता. तोल गेल्याने 14व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला, असे तपासाअंती आपल्या अहवालात सीबीआयने स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.