आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushant Singh Rajpur Suicide Case Update | There Is A Problem As We Haven't Yet Received Even The Basic Documents Related To Sushant Singh Rajput Death Case, Bihar DGP Gupteshwar Pandey

सुशांत प्रकरणाच्या चौकशीत बिहार पोलिसांचा आरोप:डीजीपी म्हणाले - मुंबई पोलिसांनी सहकार्य केले नाही, त्यांनी ना पोस्टमार्टम अहवाल सांगितला, ना सीसीटीव्ही फुटेज व मूलभूत माहिती शेअर केली

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीजीपी म्हणाले- सुशांतच्या कुटुंबातील लोकांना हवे असेल तर सीबीआय चौकशीसाठी अर्ज करा
  • नितीश देखील म्हणाले - सुशांतच्या वडिलांनी मागणी केल्यास सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बिहार आणि मुंबई पोलिसांत संघर्ष थांबत नाहीये. डीजीपी गुप्तेश्वर पांडेय म्हणाले की, मुंबई पोलिस याप्रकरणी सहकार्य करत नाहीत. त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि आतापर्यंत तपासात समोर आलेल्या कोणत्याही सूचना आम्हाला दिल्या नाहीत.

डीजीपी म्हणाले की, सुशांत आत्महत्या प्रकरण एक मोठे रहस्य बनले आहे. बिहार पोलिस तपासासाठी सक्षम आहेत. कुटुंबातील लोकांची इच्छा असेल तर सीबीआय चौकशीसाठी अर्ज करू शकतात. या प्रकरणात ज्यांना आरोपी बनवले आहे, ते पळून जात आहे. बिहार पोलिस केस इतक्या सहजपणे जाऊ देणार नाहीत. सत्य समोर आणूच राहील.

नितीश म्हणाले - वडिलांनी मागणी केल्यास सीबीआय चौकशीची शिफारस शक्य

शनिवारी मुख्यमंत्री नितीश कुमार देखील म्हणाले होते की, सुशांतचे वडील केके सिंह यांनी मागणी केल्यास सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल. एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिस मुंबईत येऊन तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावे. दरम्यान ते म्हणाले, या तपासात दोन राज्यांमध्ये भांडण होण्याचे काहीही कारण नाही. नितीश यांच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे किंवा माहिती असेल त्यांनी घेऊन यावी. आरोपीला निश्चित फाशीची शिक्षा दिली जाईल.

14 जूनला सुशांतची मुंबईत आत्महत्या, कथित गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबीयांवर पाटण्यात केस दाखल

14 जून रोजी सुशांतसिंह राजपूतने मुंबईत स्थित आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या कुटुंबीयांनी 28 जुलैला पाटणाच्या राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर दाखल केले. चार अधिकारी पुढील तपासासाठी मुंबईत आले आणि तपासणी सुरु केली. परंतु मुंबई पोलीस बिहार पोलिसांना तपासात मदत करत नसल्याचे आरोप होत आहेत. बिहार पोलिसांना गाडी उपलब्ध करून देण्यात आली नाही तसेच आतापर्यंत झालेल्या तपासाचे कोणतेही कागदपत्र देण्यात आले नाहीत. सुशांतच्या मृत्यूनंतर सतत सीबीआय तपासाची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...