आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Welcome 2021
  • Sushant Singh Rajput Death Reason To China Wuhan BAT Coronavirus; 15 Biggest Controversies Of 2020, Year Ender Latest News Update;

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलविदा 2020:भारतात CAA-NRC आणि कृषी कायद्याच्या विरोधापासून ते अमेरिकेत फ्लॉयड यांच्या हत्येपर्यंत, जाणून घ्या वर्षातील 15 वाद

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाशी लढा देत असलेल्या जगात संपूर्ण वर्षभर सुरू होते वाद

2020 मानवतेसाठी सर्वात वाईट वर्षांमधून एक मानले जात आहे. अमेरिकेच्या चर्चित टाइम मॅगझीननेही हे म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 7.5 कोटीपेक्षा जास्त लोक पीडित आहेत आणि 15 लाखांपेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आहे.

एकट्या भारतामध्ये एक कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 2020 केवळ कोरोनाच्या नावे राहिले नाही, यावर्षी अनेक वादही झाले. भारतात 2020 ची सुरुवात नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजेच CAA आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस म्हणजेच NRC च्या विरोध-प्रदर्शनाने झाली. तर या वर्षाचा शेवट कृषी कायद्याच्या विरोधांवर होत आहे.

तिकडे, अमेरिकेमध्ये कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉयड यांची 25 रोजी हत्या झाली. या हत्येने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची खुर्ची हलवली. तर कोरोना पसरवण्याविषयी चीनवर वाद झाला. चला तर मग जाणून घेऊया देश आणि जगातील 15 सर्वात मोठे वाद.

अमेरिकेचा आरोप : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा कोरोना नाही, चीनी व्हायरस आहे. जगाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी चीनने हे पसरवले आहे. आजार लपवला, खोटे बोलले आणि भ्रम पसरवला.

चीनचा पटलवार : चीनी सरकारचा दावा - 'कोरोना दुसऱ्या देशांपेक्षा विशेषतः अमेरिकेतून आयात केलेल्या पदार्थांमधून आला.' चीनने हे देखील म्हटले की, व्हायरस नैसर्गिक आहे. हा लॅबमध्ये तयार झाला नाही. कम्युनिस्ट सरकारने सर्वात पहिले कोरोना व्हायरस पसरवण्याचे वृत्त देणाऱ्या वुहान हॉस्पिटलचे डॉ. ली वेंलियांग यांना धमकी दिली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर यावर माफीही मागितली.

पाच देश करत आहेत तपास : सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड आणि कॅनडा मिळून कोरोना पसरवणाऱ्याचा तपास करत आहेत.

आंदोलकांचा आरोप : सरकार CAA आणि NRC च्या माध्यमातून एक विशेष धर्माच्या लोकांना निशाणा बनवत आहे.
सरकारचे उत्तर : गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत म्हटले - 'CAA भारतीयांचे नागरिकत्व हिसकावण्यासाठी नाही, तर दुसऱ्या देशांमध्ये धार्मिक कारणांनी त्रस्त शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे.'

सुप्रीम कोर्टात आहे प्रकरण : कोरोना व्हायरसमुळे पोलिसांनी शाहीन बागमधून आंदोलकांना हटवले. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात 144 याचिका दाखल झाल्या. सुनावणी सुरू आहे.

सुशांतच्या चाहत्यांचा आरोप : बॉलिवूडच्या नेपोटिज्म गँगने सुशांतचे चित्रपट हिसकावले. अवॉर्ड नाइट्समध्ये त्यांचा अपमान केला. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

सुशांतच्या कुटुंबाचा आरोप : रियाने कट रचला. सुशांतला कुटुंबासून दूर केले आणि लपून ड्रग्स देत राहिली. रियाच सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे.

रियाचची बाजू : सुशांत आपल्या कुटुंबामुळे त्रस्त होता. पहिल्यापासूनच ड्रग्स घेत होता. त्याला बायपोलर डिसऑर्डर होता.

सीबीआय आणि एनसीबीचा तपास सुरू : सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) मृत्यूमध्ये ड्रग्सची भूमिका तपासत आहे. रिया आणि भाऊ शोविकला ड्रग्स प्रकरणात जामिन मिळाला आहे.

कंगनाचा आरोप : सुशांत मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांनी काही खास लोकांना वाचवले. आवाज उठवल्यावर सरकारने घाबरवण्यासाठी ऑफिस पाडले.

महाराष्ट्र सरकारचे स्पष्टीकरण : कंगनाने अवैध बांधकाम केले होते. यामुळे बीएमसीने आपले काम केले. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊतांनी कंगनासाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, याचा अर्थ ते कंगनाला नॉटी गर्ल म्हणाले होते.

हायकोर्टाने भरपाई देण्यास सांगितले : मुंबई हायकोर्टाने कंगनाचे ऑफिस पाडल्यावर BMC ला फटकारले आणि कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगितले. 2 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी कंगनाच्या मागणीवर सर्व्हेअर मार्च 2021 मध्ये उच्च न्यायालयात अहवाल सादर करेल.

एका गटाचा आरोप : भाजप खासदार रवी किशन यांनी लोकसभेत म्हटले की, फिल्म इंडस्ट्री ड्रग्सच्या विळख्यात आहे. भाजप नेता तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी करण जौहरच्या एका पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर झाल्याचा दावा केला होता.

दुसऱ्या गटाचे उत्तर : सपा खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत म्हटले - 'ड्रग्सच्या नावावर बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट आहे.'

NCB चा तपास सुरू : कॉमेडियन भारती सिंह, तिचा पती हर्षला जामिन मिळाला आहे. दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि रकुल प्रीतची चौकशी करण्यात आली होती. NCB चा दावा आहे की, त्यांच्याजवळ काही मोठे अॅक्टर्स ड्रग्स घेत असल्याची माहिती आहे. नावे समोर आलेली नाहीत.

पोलिसांचा आरोप : मरकजने कोरोना बचावासाठी जारी केलेल्या निर्देशाचे पालन केले नाही. मुद्दामून संक्रमण पसरवले. निष्काळजीपणा दाखवला. जनता कर्फ्यूच्या वेळी तबलीगी जमातचे दोन ते अडीच हजार लोक एकत्र आले होते.

जमातचे उत्तर : जनता कर्फ्यूच्या घोषणेपूर्वीच लोक जमा झाले होते. रेल्वे सेवा थाबंल्याने आणि पोलिस-प्रशासनाकडून लोकांना घरा पाठवताना सहयोग मिळाला नाही.
कोर्टात केस : कोर्टाने मरकजमध्ये सामिल 36 विदेशी आरोपींना जामिन दिला आहे. कोर्टाने दिल्ली पोलिसांना गृह मंत्रालयाकडून लिस्ट घेऊन विना टेस्ट आयडेंटिटी परेडच्या अटकेसाठी फटकारले.

आयुष मंत्रालयाचा आरोप : रामदेव बाबांचे औषध लॉन्चिंगनंतर आयुष मंत्रालयाने म्हटले - 'अशा कोणत्याही औषधाविषयी माहिती नाही, याची विक्री केली जाऊ नये.'

पतंजलीचे स्पष्टीकरण : पतंजलीचे चेअरमन बालकृष्ण म्हणाले, 'कम्यूनिकेशन गॅप झाला. उपचार नाही तर प्रतिबंधासाठी आहे. नाव बदलून दिव्य श्वासारि कोरोनिल किट ठेवले.'

जबरदस्त विक्री : चार महिन्यात पतंजलीने 250 कोटी रुपयांची 25 लाख दिव्य श्वासारि कोरोनिल किट विकली.

शेतकऱ्यांचा आरोप : आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले, 'तीन नवीन कृषी कायद्यांनी MSP संपेल, साठवणूक वाढेल. मंड्या संपतील आणि बिझनेसमन शेतकऱ्यांवर अधिराज्य गाजवतील.'

सरकारचे उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले की, MSP कायम राहिल. खासगी मंड्यांवर राज्य सरकार टॅक्स लावू शकतील. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने शेतकऱ्यांना योग्य मूल्य मिळेल.

सिंघु बॉर्डरवर जमले आहेत शेतकरी : दिल्लीच्या सिंघूंसह अनेक सीमा स्थळांवर हजारो शेतकरी जमले आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात वाटाघाटी होऊ शकलेली नाही. सुप्रीम कोर्टाने चर्चेसाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यास सांगितले आहे. तसेच हे कायदे होल्ड करण्यावर सल्ला मागितला आहे.

वाद 9

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये टसल
रोहित शर्माने दुखापत होऊनही आयपीएल फायनल खेळली. मात्र ऑस्ट्रेलिया सीरीजसाठी गेला नाही. याविषयी कोहलीच्या वक्तव्याने वाद उद्भवला.

विराटचा आरोप : कर्णधार म्हणाला की, टीम मॅनेजमेंटला रोहित ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर न जाण्याचे वृत्त आहे.
रोहितचा बचाव : प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माची हेल्थ अपडेट जाहीर केले. सांगितले की ते दुखापतीतून बरे होत आहेत.

रोहित ऑस्ट्रेलियात पोहोचला : कोहलीच्या वक्तव्यानंतर रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया गाठला आहे. पण 14 दिवस तो क्वारंटाइन राहणार आहे. तिसर्‍या कसोटीत त्याचे पुनरागमन होणे अपेक्षित आहे.

वाद 10

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांची हत्या : हिप-हॉप आर्टिस्ट जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यने अमेरिकेत हिंसक प्रदर्शन झाले. श्वेतवर्णिय विरुद्ध कृष्णवर्णिय असा वाद सुरू झाला. टाइम मॅग्झीनची रिपोर्ट, फ्लॉयडवर ट्रम्प यांची भूमिका त्यांच्या अपयशाच्या कारणांपैकी एक आहे.

आंदोलकांचा आरोप : ट्रम्पच्या राजवटीत श्वेतांचा अहंकार वाढला. कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉइडची मान, गुडघ्याने दाबणाऱ्या श्वेत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अहंकार होता.

ट्रम्प यांचे दोन विधानः ट्रम्प यांनी प्रथम ट्विट केले, 'जर लूटमार झाली तर गोळी मारणे सुरू करतील.' त्याचा इशारा कृष्णवर्णिय निदर्शकांना होता. यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले- 'अमेरिकेत नोकरीची स्थिती सुधारत आहे. वरुन जॉर्ज फ्लॉयड पहात आहे. त्यांच्यासाठी हा एक चांगला दिवस आहे.' त्यांच्या वक्तव्यानंतर वाद वाढला.

कोर्टात आहे प्रकरण : चौकशीदरम्यान फ्लॉइड यांच्या हत्येत सामिल असलेले पोलिस कर्मचारी डेरेक शॉविन, थॉमस लेन, जे एलेक्जेंडर आणि डाउ थाओ यांना नोकरीवरुन काढून हत्येचा खटला चालवला.

वाद 11

अमेरिका निवडणूक निकाल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत आपल्या विजयाचा दावा करत राहिले. त्यांनी आरोप लावला की, कोरोनाचा फायदा घेत निवडणुकीत घोळ केला जात आहे.

ट्रम्प यांचा पक्ष : निवडणुकीत पोस्टल बॅलेटने टाकण्यात आलेल्या मतांमध्ये घोळ करण्यात आला. निवडणुकीनंतर मतांच्या मोजणीमध्येही घोळ करण्यात आला.

जो बायडेन यांचा पक्ष : अमेरिकेच्या प्रेसिडेंट इलेक्टने म्हटले की, निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष झाली.

सुप्रीम कोर्ट देणार निर्णय : दोन राज्यांच्या घोटाळ्याच्या आरोपांना सुप्रीम कोर्टाने फेटाळले. इतर राज्यांच्या प्रकरणात 6 जानेवारीपर्यंत निर्णय येतील.
वाद 12

WHO वर कोरोनाची माहिती लपवणे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा आरोप लागला. अमेरिकेने फंडिंग थांबवली. WHOची एकूण फंडिंगच्या 40 टक्के भाग अमेरिका देत होते.

ट्रम्प यांचा आरोप : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, 'WHO'आणि चीनने मिलीभगत केली. दोघेही कोरोना पसरण्याची माहिती लपवून ठेवली. लोकांमध्ये भ्रम पसरवला.' यानंतर अमेरिकेने WHO ची फंडिंग थांबवली.

WHO चे स्पष्टीकरण : WHO ने आरोप फेटाळून लावले आणि अमेरिकेस फंडिंग बहाल करण्यास सांगितले. दावा केला की, फंडिंग थांबवल्याने संपूर्ण जगाचे नुकसान होईल.

तणाव कमी होण्याची अपेक्षा नाही : अमेरिकेत जो बायडेन यांची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होऊनही WHO सोबत तणाव कमी होण्याची अपेक्षा नाही. बायडेन या प्रकरणात चीन आणि WHO च्या विरोधात आहेत.

वाद 13

ईरानी कमांडर यांना मारले गेले
ईरानमध्ये जनररल कासिम सुलेमानी सर्वात जास्त पसंत केली जाणारी व्यक्ती होती. त्यांच्या मृत्यूनंतर ईरानच्या जबाबी कारवाईच्या भितीने जगात तणाव निर्माण झाला.

आंदोलकांचा आरोप : अमेरिकेने ईरानच्या कुद्स फोर्सचे कमांडर सुलेमानी यांना दहशतवादी घोषित केले आणि 3 जानेवारीला ड्रोसनने हल्ला करत त्यांची हत्या केली. हे बेकायदेशीर आहे.

अमेरीकेचे स्पष्टीकरण : अमेरिकेने सर्वात पहिले सुलेमानी यांना मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेतील नागरिकांच्या संरक्षणासाठी ईरानी कमांडरला मारण्यात आले. सुलेमानी दिल्लीपासून ते लंडनपर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामिल होता.

आंदोलन मंदावले : ईराणमध्ये सुरुवातीला आंदोलनात मोठ्या संख्येत लोक रस्त्यांवर उतरले. ईराणने कठोर बदला घेण्याची घोषणा केली आणि 7 जानेवारीला ईराणच्या सैन्याने इराकमध्ये अमेरिकेच्या तळांवर मिसाइल सोडल्या. पेंटागनने 110 जवान जखमी झाल्याचे सांगितले. यानंतर वाद संपला.

वाद 14

बाबा का ढाबा
वयस्कर दाम्पत्याने यूट्यूबर गौरव वासन धोकेबाज असल्याचे सांगितले. बाबा का ढाबासाठी आलेल्या आर्थिक मदतीमध्ये घोळ केल्याविषयी तक्रार दाखल केली.

कांता प्रसाद यांचा आरोप : यूट्यूबरने गुपचूप व्हिडिओ शूट केला. न सांगताच लोकांना पैसे पाठवण्याचे आवाहानन केले. अकाउंट नंबर आपल्या मित्रांचे दिले. मदतीसाठी मिळालेले पूर्ण पैसे दिले नाही.

गौरव वासनचे उत्तर : आता कुणाची मदत करण्यापूर्वी विचार करावा लागेल. बाबा का ढाबाच्या संबंधात पैसे देवाण-घेवाणीची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे.

वाद सुरू आहे : गोरवने पोलिसांना बँक स्टेटमेंट दिले आहे. पोलिस तपास करत आहेत. नुकतेच कांता प्रसाद यांनी तक्रार केली आहे की, गौरवने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

वाद 15

कॅरेमिनाटी विरुद्ध टिक टॉक
यूट्यूबर अजय नागर म्हणजे कॅरेमिनाटीने टिकटॉकर्सला आपल्या निशाण्यावर घेतले. यूट्यूबर्स आणि टिकटॉकर्समध्ये वाद सुरू झाला. यानंतर सोशल मीडियावर तरुण दोन भागांमध्ये विभागले.
कॅरेमिनाटीचा आरोप : टिकटॉकर्स एका विशेष धर्मासाठी व्हिडिओ बनवतात आणि द्वेष पसरवतात. त्यांना बॅन करायला हवे.

टिकटॉकर्सने घेरले : कॅरेमिनाटीसारखे लोक टिक टॉक कमी काळात जास्त प्रसिद्ध झाल्याने जळत आहेत. सातत्याने टिक टॉकला निशाणा बनवत आहेत. अॅपच्या बॅनमध्ये यूट्यूबर्सचीही भूमिका आहे.

ऑनलाइन वाद अजुनही सुरू : भारतात टिक टॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉकर्सने यूट्यूबवर अकाउंट बनवले. आता येथे दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. तर चीनी कंपनी बाइटडांस टिक टॉकसह दुसरे अॅप्स बहाल करण्यासाठी भारत सरकारशी बोलत आहे.

बातम्या आणखी आहेत...