आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Welcome 2021
  • Sushant Singh Rajput Rishi Kapoor To Irrfan Pranab Mukherjee | List Of Important People Who Died In 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये या दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप:इरफानच्या डोळ्यांपासून सुशांतच्या स्मित हास्यापर्यंत, यावर्षी या व्यक्ती काळाने आपल्यापासून हिरावून घेतल्या

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2020 हे वर्ष खूप निर्दयी निघाले. या वर्षाने आपल्याकडून खूप काही हिसकावून घेतले.

एक मुलगा ज्याचे स्मित हास्य सर्वात निराळे होते, एक तरुण ज्याचे डोळे बोलायचे, एक वयस्कर व्यक्ती जिने भारताला बनताना पाहिले होते, एक साधक ज्याने आलापामध्ये संगीत मिसळले होते. 2020 हे वर्ष खूप निर्दयी निघाले. या वर्षाने आपल्याकडून खूप काही हिसकावून घेतले. आता राहिल्या फक्त आठवणी, किस्से, गोष्टी आणि वारसा. निघून जात असलेल्या 2020 सोबत आपण अशा 14 प्रसिद्ध सेलिब्रिटींचे स्मरण करुया, जे या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.

'पुढच्या जन्मात घोडा नाही, या जन्मात राष्ट्रपती बनणार'

प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी त्यांची बहिण अन्नपूर्णा दिल्लीत आली होती. प्रणब दा यांनी राष्ट्रपती भवनातील बग्घीमध्ये बांधलेला घोडा पाहून आपल्या बहिणीला म्हटले होते - या आलिशान भवनाचा आनंद घेण्यासाठी पुढच्या जन्मात घोडा बनणे पसंत करेन. यावेळी त्यांच्या बहिणीच्या तोंडातून निघाले - पुढच्या जन्मात घोडा नाही, तु याच जन्मात राष्ट्रपती बनणार. 2012 मध्ये प्रणब मुखर्जी भारताचे 13 वे राष्ट्रपती बनले.

प्रणव दा यांचा जन्म बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील मिराती गावात झाला होता. अखेरच्या काळात प्रणब दा यांची ब्रेन सर्जरी झाली होती. ज्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संक्रमण झाले होते. त्यांनी 31 ऑगस्ट 2020 ला वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

'मला विश्वास आहे, मी आत्मसमर्पण केले आहे'

'मला विश्वास आहे, मी आत्मसमर्पण केले आहे', हे ते काही शब्द आहे, जे इरफानने 2018 मध्ये कँसरसोबतची आपली लढाई सांगताना लिहिले होते. या अत्मसमर्पणच्या जवळपास दोन वर्षांनंतर एका सकाळी त्याचा श्वास थांबला. तो न्यूरोएंडोक्राइन कँसरचा सामना करत होता.

इरफान ने 'हासिल', 'मकबूल', 'लाइफ इन अ मेट्रो', 'द लंच बॉक्स', 'पीकू', 'तलवार' आणि 'हिंदी मीडियम' अशा अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले. 'पान सिंह तोमर' साठी इरफान खानला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

'आमच्या कहाणीचा अंत झाला'

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर पत्नी नीतू यांनी त्यांची आठवण काढत फायनल गुडबाय म्हटले आहे. नीतू यांनी इंस्टाग्रामवर ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ते व्हिस्कीचा ग्लास घेत स्मित हास्य करताना दिसत होते. नीतू यांनी त्यांचा हा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले होते की, 'आमच्या कहाणीचा अंत झाला'

कँसरचा सामना करत असताना 30 एप्रिलला वयाच्या 68 व्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांनी आपल्या 5 दशकांच्या दिर्घ अभिनय करिअरचा वारसा सोडला आहे. त्यांनी 1973 मध्ये 'बॉबी' चित्रपटातून अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली आणि 2019 मध्ये त्यांचा अखेरचा 'द बॉडी' चित्रपट रिलीज झाला.

अॅक्टर ज्याने चंद्रावर प्लॉट खरेदी केला

सुशांतने 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्यांचा हा प्लॉट 'सी ऑफ मसकोवी' मध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या प्लॉटवर नजर ठेवण्यासाठी एक दूरबीनही खरेदी केली होती. त्याच्याजवळ एडवांस टेलिस्कोप 14LX00 होते. 14 जून 2020 ला 34 वर्षांचा सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

सुशांतचा जन्म पाटणामध्ये झाला होता. इंजीनियरिंग करण्यासाठी तो दिल्लीत आला. येथे त्याने शिक्षणासोबत थिएटर करण्यासही सुरुवात केली. नंतर थिएटरपासून टेलीव्हिजन आणि नंतर चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला. त्याने काय पो चे, शुद्ध देसी रोमांस, एमएस धोनी, पीके, केदारनाथ आणि छिछोरे सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सुशांतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' त्याच्या निधनानंतर रिलीज झाला.

'दीवाना बनाना है, तो दीवाना बना दे'

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी एकदा सांगितले होते की, 'हैदराबादमध्ये रोज शाळेत जाताना रस्त्यात एक हॉटेल होती. जेथे बेगम अख्तर यांनी गायलेली गजल ‘दीवाना बनाना है तो दीवाना बना दे, वरना तकदीर तमाशा ना बना दे’ ऐकायला येत होती. माझे पाय तिथेच घुटमळायचे. आवाजात अशी कशिश होती की, मी पुढेही जाऊ शकत नव्हतो' पंडित जसराज यांच्या संगीताचे बीज येथेच पेरले गेलेले होते.

28 जनवरी 1930 ला हरियाणाच्या हिसामध्ये जन्मलेल्या पंडित जसराज यांनी शास्त्रीय संगीताला 80 वर्षांपेक्षा जास्त वेळ दिला. त्यांना पद्मविभूषणासह अनेक सन्मानांनी भूषवण्यात आले. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने 11 नोव्हेंबर 2006 ला शोधलेल्या एका ग्रहाचे नाव 'पंडित जसराज प्लॅनेट' असे ठेवले. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत ते अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे होते.

त्या भविष्यवाणीने स्तब्ध झाला संपूर्ण देश

बेजान दारुवाला यांनी भविष्यवाणी केली होती की, संजय गांधींचा मृत्यू अपघातात होईल. 3 जून 1980 ला संजय गांधींचा एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश चकीत झाला होता. अशा प्रकारेच त्यांनी नरेंद्र मोदींच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. कोरोनाविषयी दारुवाला म्हणाले होते की, 15 मेनंतर त्याचा प्रभाव कमी होईल. 29 मे 2020 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोना झाला होता.

बेजान दारुवाला यांचा जन्म 11 जुलै, 1931 ला मुंबईत झाला होता. ते पारसी कुटुंबातील होते. 2003 मध्ये बेजान दारुवाला यांनी आपल्या ज्योतिष वेबसाइटची सुरुवात केली होती. त्यांनी देशात ज्योतिषचा एक ट्रेंड सेट केला.

'तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना'

एसपी बालासुब्रमण्यम यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते, 'माझे लक्ष्य सिंगर बनणे नव्हते. हा केवळ एक अपघात होता. मी खूप चांगला गायचो, हे मी मान्य करतो. मात्र मला इंजीनियर बनायचे होते' एसपी यांनी संपूर्ण करिअरमध्ये 16 भाषांमध्ये विक्रमी 40 हजारांपेक्षा जास्त गाणे गायले आहे.

एसपी बालासुब्रमण्यम यांनी 1981 मध्ये 'एक दूजे के लिए' साठी पहिल्यांदा हिंदीमध्ये गाणे गायले. यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्डही मिळाला. ' तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना' हे ते गाणे होते. 25 सप्टेंबर 2020 वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

'लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना'

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे आपल्या आयुष्यातील किस्सा ऐकवतात, 'एकदा मला कुणीतरी जिहादी म्हटले. हे ऐकून मी रात्रभर झोपू शकलो नाही. विचार करत बसलो की, मी कसा जिहादी आहे? तेव्हाच मला सकाळची अजान ऐकायला आली. मला जाणिव झाली की, मी जिहादी तर नाही मात्र काही तरी वेगळा नक्की आहे. ' यानंतर राहत इंदौरी यांनी एक शेर लिहिला - 'मैं मर जाऊं तो मेरी एक पहचान लिख देना, लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना।'

राहत इंदौरी यांचा जन्म मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये एका कपडा मिल कर्मचाऱ्याच्या घरी झाला होता. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी शायरी करणे सुरु केले होते आणि अखेरपर्यंत ते सक्रिय होते. राहत यांनी बॉलिवूडच्या खुद्दार, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर, इश्क सारख्या चित्रपटांसाठी अनेक गाणे लिहिले. ते कोरोना संक्रमित आढळले होते, यानंतर हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

गांधी कुटुंबानंतर काँग्रेसचे सर्वात मजबूत नेता

जंतर-मंतरवर अहमद पटेल यांची मुलाखत घेत असलेल्या रिपोर्टरचा मोबाइल कुणीतरी चोरला. जेव्हा रिपोर्टरने दुसऱ्या मोबाइलवर आपला नंबर ऑन केला तेव्हा त्यामध्ये सर्वात पहिला मॅसेज अहमद पटेल यांचा होता. पटेल यांनी म्हटले - 'माझ्यामुळे तुमचा फोन चोरी झाला, खूप वाईट झाले. आता तुम्ही कसे मॅनेज कराल?' असे संबंध त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार आणि कॉर्पोरेट्ससोबत होते.

काँग्रेसेचे मोठे नेते अहमद पटेल यांचे वयाच्या 71 व्या वर्षी 25 नोव्हेंबरच्या सकाळी निधन झाले. ते कोरोना संक्रमित होते. आपल्या राजकीय करिअरमध्ये जवळपास 4 दशकांमध्ये ते इंदिरा गांधींपासून राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार राहिले.

'माझ्या नावातच राम आहे'

ज्या काळात राम विलास पासवान हे NDA चे सहयोगी नव्हते तेव्हाचीही गोष्ट आहे. हिंदुत्त्वाच्या राजकारणाचा उल्लेख झाला, तेव्हा पासवान यांनी अटल बिहारी वाजपेयींना म्हटले, 'माझ्या नावातच राम आहे. बीजेपी जवळ कुठे आहे राम? यावर वाजपेयी आपल्या अंदाजात म्हणाले - पासवानजी, हराममध्येही राम असतो.'

रामविलास पासवान यांची राजकीय कारकिर्द 1969 मध्ये सुरू झाली होती. तेव्हा ते संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकीटावर निवडणूक जिंकून बिहार विधानसभेचे सदस्य बनले होते. खगडियामध्ये एका दलित कुटुंबात 5 जुलै 1946 ला रामविलास पासवान यांचा जन्म झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते बिहार प्रशासकिय सेवेत अधिकारी होते.

महाशय दी हट्टीला बनवले MDH

धर्मपाल सिंह गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 ला पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. फाळणीच्या वेळी त्याचे कुटुंब अमृतसरला गेले. काही काळानंतर ते कुटुंबासमवेत दिल्लीला आले होते. जेव्हा ते दिल्लीला आले तेव्हा त्याच्याकडे फक्त 1500 रुपये होते. त्यांच्यासमोर रोजगाराचे संकट होते. 1500 रुपयांपैकी त्यांनी 650 रुपयांचा घोडा-टांगा खरेदी केला आणि रेल्वे स्टेशनवर टांगा चालवू लागले.

धर्मपाल गुलाटी यांच्या मेहनतीचा परिणाम MDH आज जवळपास 2000 कोटी रुपयांचा ब्रांड बनला आहे. MDH ची आज भारत आणि दुबईमध्ये जवळपास 18 कारखाने आहेत, ज्यामध्ये तयार मसाले अनेक देशांमध्ये विकले जाते. एक सुंदर आयुष्य जगल्यानंतर वयाच्या 98 व्या वर्षी या मसाला किंगचे निधन झाले. त्यांना पद्म भूषणने सन्मानितही करण्यात आले आहे.

ज्याला राजकारणाचे डाव शिकवले त्याच्याकडूनच मिळाली मात

केशुभाई तख्तापलट झाल्याने दोन्हीही वेळा मुख्यमंत्रीची टर्म पूर्ण करु शकले नाहीत. 2001 मध्ये नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मीडियाला म्हटले, 'राज्याची खरी कमांड केशुभाईंच्या हाती आहे. ते भाजपच्या रथाचे सारथी आहेत. मला त्यांच्या मदतीसाठी गियरसारखे फिट केले आहे '

केशुभाई पटेल यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. 2006 मध्ये जिममध्ये लागलेल्या आगीत त्यांचा पत्नी लीलाबेन यांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2017 मध्ये त्याचा 60 वर्षीय मुलगा प्रवीणचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अखेर 29 ऑक्टोबर 2020 रोजी केशुभाई पटेल यांचेही निधन झाले.

'मला दलाल म्हणून शकता, पण सत्ता देणे माझे टॅलेंट आहे'

अमर सिंह यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते- 'तुम्ही मला बिचौलिया किंवा दलाल देखील म्हणू शकता, परंतु मी कधीही सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याची इच्छा व्यक्त केली नाही. मी संबंध आणि सत्तेला सर्वाधिक महत्त्व देतो. ' अशा वक्तव्यांमुळे अमरसिंह यांची स्पष्ट बोलणारी नेत्याची प्रतिमा निर्माण झाली.

1 ऑगस्ट रोजी अमर सिंग यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. ते बराच काळ आजारी होते आणि सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच रुग्णालयातून त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. त्यात त्यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली होती.

किरायाने सायकल घेऊन फिरायचे

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे 21 डिसेंबर रोजी निधन झाले. दिल्लीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 2000 ते 2018 या काळात ते पक्षाचे कोषाध्यक्ष देखील होते.

ज्येष्ठ संपादक रमेश नय्यर म्हणाले की, सर्वांना मोतीलाल यांच्या कष्टकरी व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती होती. पत्रकार व्यतिरिक्त मोतीलाल वोरा यांनी दुर्ग, राजनांदगांवमध्ये पेट्रोल डिस्ट्रीब्यूशन आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्येही काम केले होते. एकेकाळी ते किरायाच्या सायकल घेऊन फिरायचे.

बातम्या आणखी आहेत...