आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushant Singh Suicide Case : Bihar DGP Gupteshwar Pandey Reaction On Sushant Singh Rajput Rhea Chakraborty Case Supreme Court Verdict

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बिहार पोलिस:बिहारच्या पोलिस महासंचालकांनी काढली रियाची लायकी, म्हणाले - बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही, नितीश कुमारांचे कौतुक

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बिहार पोलिसांच्या तपासणीत मुंबई पोलिसांनी काय केले प्रत्येकाने पाहिले' - डीजीपी गुप्तेश्वर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आता सीबीआय चौकशी करणार आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी हा आदेश दिला. यावर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, हा न्यायाचा विजय आहे. रिया चक्रवर्तीच्या परिवाराकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टिप्पणी करण्यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याची त्यांची लायकी नाही. नितीशकुमार यांच्या पाठिंब्यानेच सुशांतच्या कुटुंबातील लोकांना न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

रियाने म्हटले होते - बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी एफआयआरमध्ये रस दाखविला

रियाने सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, तिच्याविरोधात माध्यमांमध्ये ट्रायल सुरू आहे. सुशांतचे प्रकरण अतिशयोक्तीने दाखवले जात आहे. याचे कारण बिहार निवडणुका आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयआर नोंदवण्यात रस दर्शविला आहे.

देशातील 130 कोटी लोक सुशांतसाठी लढत आहेत

डीजीपी पांडे म्हणाले की, ''बिहार पोलिस योग्य काम करत होते हे सिद्ध झाले. बिहार पोलिसांच्या तपासणी दरम्यान मुंबई पोलिसांनी काय केले हे सर्वांनी पाहिले. देशातील 130 कोटी लोक सुशांतच्या न्यायासाठी लढा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रत्येकजण आनंदी आहे.''

डीजीपी म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे लोकांच्या मनात आशा आहे की सुशांतसिंग प्रकरणात न्याय मिळेल. संपूर्ण देशासाठी ही मोठी बाब आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाकडे पहात होता. आमच्यावर असेही आरोप ठेवले जात होते की आम्ही घटनात्मकदृष्ट्या कायदेशीररित्या योग्य ते केले नाही. कोर्टाच्या निर्णयाने सर्व काही स्पष्ट झाले आहे.

बिहार पोलिस योग्य काम करीत असल्याचे सिद्ध झाले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहार सरकार आणि पोलिसांविरोधात दिलेल्या विधानावर डीजीपी पांडे म्हणाले की, राजकीय लोकांनी भाष्य करू नये. आम्ही घेतलेली भूमिका सुप्रीम कोर्टाने सिद्ध केल्याने आनंद झाला. आम्ही सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत होतो. लोकशाहीवर लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला.

बातम्या आणखी आहेत...