आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushil Kumar And His Gang Beating Wrestler Sagar And His Friends With Hockey Stick VIDEO CLIPS

पैलवान सागर मर्डर केस:छत्रसाल मर्डर प्रकरणातील व्हिडिओ आला समोर; पैलवान सागरला हॉकी स्टिकने अमानुष मारहाण करताना दिसला ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पैलवान सागर रानाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऑलिम्पियन सुशील कुमार मित्रांसोबत सागरला हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुशील कुमारने स्वत: मित्राच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून कुस्तीच्या सर्कीटमध्ये त्याचा वचक राहील. व्हिडिओमध्ये, 23 वर्षीय सागर धनकड रक्ताने माखलेला दिसत आहे.

आरोपी सुशील कुमार व अन्य 3 जणांनी त्याला घेराव घातला. प्रत्येकाच्या हातात हॉकी स्टिक दिसत आहे. असे सांगितलं जात आहे की, हा व्हिडिओ स्वत: सुशीलचा साथीदार प्रिन्स दलालने बनवला होता. त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुशील आणि त्याचा पीए अजय यांच्यासह आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सुशीलचा आणखी एक साथीदार रोहित करोर याला अटक करण्यात आली. तर, 4 आरोपी नीरज बवाना गँग आणि कला-असोदा गँगचे सदस्य आहेत.

फ्लॅट भाड्याचा वाद पोलिसांना अमान्य
आतापर्यंतच्या चौकशीत सागरच्या मृत्यूचे कारण मॉडल टाऊनचा एक फ्लॅट सांगितला गेला. तो रिकामा केल्यानंतर दोन महिन्यांच्या भाड्यावरून वाद झाला होता. मात्र ही कथा गुन्हे शाखेला मान्य नाही. यामुळे दोन्ही आरोपींची चौकशी करून घटनेचे खरे कारण जाणून घेतले जात आहे. सागरसोबत त्याचा कधीपासून वाद होता हे सुशीलकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सागर सुशीलला गुरू मानत असतानाही असे काय घडले की एवढी मोठी घटना घडली. छत्रसाल मैदानात घटनेच्या रात्री सुशीलसोबत कोण होते?

बातम्या आणखी आहेत...