आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushil Kumar Bail Update; Delhi Court Chhatrasal Brawl Case Hearing Latest News Today; News And Live Updates

पैलवान सागर मर्डर प्रकरण:सुशील कुमारची अटकपूर्व जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली; ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटूवर पोलिसांनी ठेवले 1 लाख रुपयांचे बक्षीस

दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशीलने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

छत्रसाल स्टेडियममध्ये ज्यूनिअर गोल्ड मेडलिस्ट सागर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुशील कुमारची अटकपूर्व जामीन याचिका दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयात मंगळवारी संबंधित प्रकरणावर सुनावणी झाली. दरम्यान, त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता न्यायालयाने आपला निकाल दिला. आरोपी सुशील कुमारने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वी लुकआऊट नोटीस जारी केली होती. परंतु, आरोपी सुशील कुमार अजूनही फरार आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी आता ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्‍यासोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक अजयवरदेखील 50 हजार रुपायांचे बक्षीस ठेवले आहे. सुशील आणि अजयसह इतरही आरोपींविरोधात दिल्ली पोलिसांनी अजामीपात्र वारंट जारी केले आहे.

मला खास ड्युटीसाठी छत्रसाल स्टेडियमवर ठेवण्यात आले होते
संबंधित प्रकरणातील ही सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांच्यासमोर झाली. सुनावणीवेळी दोन्ही गटांकडून आपापल्या बाजू मांडण्यात आल्या. यादरम्यान, सुशीलचे वकील सिद्धार्थ लूथ्रा आणि आर.एस. जाखड़ यांनी त्याचा हवाला देत म्हटले की - मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एथलिट आहे. मला पद्मश्रींसह देशातील सर्व प्रतिष्ठित पदके आणि सन्मान मिळालेले आहेत. ऑलिम्पिकमध्येही मी दोनदा पदक जिंकले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, मला ज्यूनिअर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मला छत्रसाल स्टेडियममध्ये ठेवण्यात आले असून मी तेथे माझ्या कुटुंबासमवेत राहतो.

मला विनाकारण गुंतवले जात आहे

सुशीलच्या हवाल्याने त्यांच्या वकिलाने सांगितले की, माझा या प्रकरणात काहीही संबंध नसताना विनाकारण गुंतवले जात आहे. एफआयआरमध्ये ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याची नोंद नसल्याचे सुशीलच्या वकीलाने सांगितले. सोनू नावाची व्यक्ती हिस्ट्रीशीटर असून एफआयआरमध्ये त्याच्या मागील गुन्ह्यांविषयी माहिती नाही. माझा पासपोर्ट जप्त केला आहे. माझ्या बंदुकीतून कोणत्याच प्रकाराचा गोळीबार झाला नाही व मी मृतकाला मारलेही नाही. त्यामुळे या प्रकरणात माझ्यावर खुनाचा आरोप कसा झाला हे मला माहिती नाही.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी मध्यरात्री कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद होत मारहाण झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रात मध्यरात्री 1.15 ते 1.30 दरम्यान घडली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे 5 वाहने उभी असल्याचे आढळले.

दरम्यान, या झालेल्या मारहाणीत सागर धनखार (वय 23), सोनू महल (वय 37) आणि अमित कुमार (वय 27) आणि इतर दोन कुस्तींपटू गंभीर जखमी झाले. तर उपचारादरम्यान, सागर यांचा मृत्यू झाला होता. मृतक सागर हा माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन आणि दिल्ली पोलिसातील हेड कॉन्स्टेबल यांचा मुलगा होता. तर दुसरीकडे सोनू महल हा गुंड जथेडीचा सहकारी असून यापूर्वी त्याला खून आणि दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती.

कशाबद्दल वाद झाला होता?
सांगण्यात येत आहे की, मृतक सागर आणि त्याचे मित्र ज्या घरामध्ये राहत होते ते घर रिकामा करण्यासाठी सुशील सागरवर दबाव आणत होता. त्यामुळे याचे भांडणात रुपांतरण झाले. ज्यामध्ये सागरला आपले प्राण गमवावे लागले होते.

पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेमारी
सुशील अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली-एनआरसीसह शेजारच्या अनेक राज्यांत छापेमारी केली. परंतु, पोलिसांना अद्यापही सुशील पकडण्यात यश आले नाही. पोलिसांनी या प्रकरणात सुशीलच्या सासर्‍यासह कोच सतपाल आणि कुटुंबातील सदस्य आणि ओळखीच्या लोकांचीही चौकशी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...