आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा भाजप खासदार सुशील मोदी यांनी 2000 च्या नोटेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते सोमवारी राज्यसभेत म्हणाले - मोठ्या किंमतीच्या चलनी नोटांमुळे ब्लॅकमनीची शक्यता वाढते. त्यामुळे 2 हजार रुपयांच्या चलनी नोटांवर बंदी घातली गेली पाहिजे.
विकसित अर्थव्यवस्थांत 100 च्यावर नोट नाही
राज्यसभेत सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांवर चर्चा करताना मोदी म्हणाले की, 2000 रुपयाच्या नोटाचा वापर ब्लॅकमनी, टेरर फंडिंग, ड्रग्ज तस्करी व जमाखोरीसाठी केला जात आहे. त्यामुळे काळ्या पैशाचा ओघ थांबवायचा असेल तर 2000 ची नोट तत्काळ बंद करावी लागेल. 2000 च्या नोटेचे सर्क्युलेशनमध्ये आता कोणतेही औचित्य नाही.
मोदी म्हणाले - आपण अमेरिका, चीन, जर्मनी, जपान सारख्या प्रमुख विकसित अर्थव्यवस्थांकडे पाहिले तर त्यांच्याकडे 100 च्यावर कोणतेही चलन नाही. त्यामुळे केंद्राने यावर विचार करून 2000 च्या नोटेवर बंदी घातली पाहिजे. पण यासाठी सर्वसामान्य नागरिकांनाही नोटा बदलण्यासाठी पुरेशी संधी मिळाली पाहिजे.
रिझर्व्ह बँकेने छापने बंद केले
रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्यामुळे ही नोट हळूहळू बाजारातून बंद झाली आहे. सुशील मोदींनी हा मुद्दा उपस्थित करत आगामी काळात केंद्र सरकार 2000 च्या नोटेवर बंदी घालू शकेल, असे संकेत दिले.
उल्लेखनीय बाब म्हणजे सुशील मोदींनी काही दिवसांपूर्वीच संसदेत खासदारांचा केंद्रीय विद्यालयातील कोटा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने लोकसभा व राज्यसभेतील सर्वच सदस्यांचा हा कोटा रद्द केला होता.
2016 मध्ये केली होती नोटाबंदी
केंद्रातील मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी केली होती. त्यात 500 व 1000 च्या चलनी नोटांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 500 व 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. पण हळूहळू 2000च्या नोटा बाजारून गायब झाल्या होत्या.
जदयुचा आरोप -सुशील मोदींची मागणी सरकारविरोधात
दुसरीकडे, बिहारमधील सत्ताधारी जदयुने सुशील मोदींची ही मागणी आपल्याच सरकारविरोधात असल्याचा आरोप केला आहे. जदयु प्रवक्ते अभिषेक कुमार झा म्हणाले - 'केंद्रातील भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर 2000 ची नोट चलनात आणली. आता सुशील मोदी आपल्याच सरकारच्या निर्णयावर सवाल उपस्थित करत आहेत. सुशील मोदींनी राज्यसभेनंतर पक्षीय पातळीवरही केंद्राच्या या निर्णयाचा विरोध केला पाहिजे.'
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले -'सुशील मोदींच्या या विधानाचे स्वागत केले पाहिजे. जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला होता. आता त्यांना पुन्हा जनतेच्या दरबारात जायचे असल्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. सीनियर मोदींनी (नरेंद्र मोदी) 2000 ची नोट आणली तेव्हा ज्यूनियर मोदींनी (सुशील मोदी) या निर्णयामुळे दहशतवादाचे कंबरडे मोडणार असल्याचा दावा केला होता. आता ते त्याचा विरोध करत आहेत. यावेळी प्रथमच भाजपत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला विरोध होत आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.