आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sushil Modi Vs Narendra Modi; Former Bihar Deputy Cm Finance Would Get Food Ministry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थ नाही, कृषी मंत्रालय ?:बिहारनंतर देशाच्या अर्थ मंत्रालयावर सुशील मोदींचा डोळा, पण मिळू शकते कृषी मंत्रालयाची जबाबदारी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांचे आंदोलन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात होईळ बिहारच्या मोदींची एंट्री

बिहारमध्ये अर्थ मंत्रालय सांभाळण्याचा मोठा अनुभव असलेले बिहारचे माजी उप मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी बोलून दाखवत नसले, तरी त्यांचा डोळा देशाच्या अर्थ मंत्रालयावर आहे. दुसरीकडे मोठे मोदी, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोदींसाठी ‘अन्न’शी संबंधित दोनपैकी एक मंत्रालय देण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी सुशील कुमार मोदी यांच्या राज्यसभेच्या नामांकनापूर्वी त्यांच्या मंत्रालयावर शिक्कामोतर्ब झाला आहे.

चार दिवसांपासून चर्चा सुरू

बिहारमध्ये नवीन सरकारसाठी NDA ची पहिली बैठक झाली. भास्करने तेव्हाच खुलासा केला होता की, सुशील मोदी यांना परत उप मुख्यमंत्री पद दिले जाणार नाही. त्यांना दिवंगत रामविलास पासवान यांच्या जागेवरुन राज्यसभेवर पाठवले जाईल आणि केंद्रात मंत्रीपद दिले जाईल. सुशील मोदी यांना राज्यसभेचे तिकीटही मिळाले आणि मागील चार दिवसांच्या आत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे मंत्रालयही पक्के केले.

शेतकऱ्यांच्या बहाण्याने तोमर किंवा पासवान यांचे पद दिले जाणार

कृषी कायद्याशी निगडीत वास्तव समोर आणण्यात आणि शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दुसरे मंत्रालय देऊन त्यांच्या जागी सुशील कुमार मोदी यांना कृषी खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. किंवा, सुशील मोदींना दिवंगत रामविलास पासवान यांच्या अन्न-पुरवठा मंत्रालयही दिली जाऊ शकते. पासवान यांच्या मृत्यूनंतर सध्या हे खाते, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser