आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushil, Who Won Rs 5 Crore In KBC, Builds Sprrow's Nests From House To House | Marathi News

अभियान:केबीसीमध्ये पाच कोटी जिंकणारे सुशील घरोघरी लावताहेत चिमणीचे घरटे, आपली ओळख आणि बक्षिसाच्या रकमेचा वापर चिमणीच्या पुनर्वसनासाठी

मोतिहारी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिमणी पूर्वी शहर-गाव, प्रत्येक मोहल्ल्यात दिसत होती, पण वाढत्या लोकसंख्येमुळे चिमण्यांची संख्या घटत चालल्याने पर्यावरणतज्ज्ञही चिंतित आहेत. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात या समस्येवर उपाय शोधला आहे ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) मध्ये ५ कोटी जिंकणारे हनुमानगढीतील सुशीलकुमार यांनी. केबीसीत जिंकल्यानंतर सुशील बिहारसह संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले होते.

आता ते आपली ओळख आणि बक्षिसाच्या रकमेचा वापर चिमणीच्या पुनर्वसनासाठी करत आहेत. ते घरोघरी घरोघरी जाऊन स्वखर्चाने लाकडी घरटी लावतात. त्यांच्या अभियानामुळे मोतिहारीसह आसपासच्या गावांत चिमण्यांची संख्या वाढली आहे. सुशील यांनी आतापर्यंत ५५०० पेक्षा जास्त घरांमध्ये लाकडी घरटी लावली आहेत. त्यापैकी १०५० पेक्षा अधिक घरट्यांत चिमण्या राहायला आल्या. ते घरटे लावल्यानंतर त्याची देखरेखही करतात. ते सांगतात, माझे फेसबुक मित्र संजय कुमारकडून प्रेरणा घेतली. २०१९ मध्ये जागतिक चिमणी दिनी हे अभियान सुरू केले. जोपर्यंत लोक आपल्या छतावर किंवा अंगणात मातीच्या भांड्यात पाणी व अन्न ठेवणार नाहीत तोपर्यंत ग्लोबल वाॅर्मिंगमुळे चिमण्या वाचवणे कठीण जाईल. सहसा एक छोटे घरटे लावण्यासाठी १०० रुपये आणि मोठ्यासठी ३०० रुपये खर्च येतो. सुशील म्हणतात, छोटे व मोठी मिळून ५५०० घरटी लावण्यासाठी आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त खर्च आला आहे.

बातम्या आणखी आहेत...