आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Suspected Patients Will Also Be Admitted To The Covid Center,Changes In COVID Patients Hospitalization Policy

कोरोनावर सरकारने पॉलिसी बदलली:संशयित रुग्णांनाही कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल, पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आरोग्य मंत्रालयाने रुग्ण भरती करण्याचे धोरण बदलले आहे. कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रूग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवणे आता आवश्यक नाही. म्हणजेच आता संशयित रुग्णही कोविड सेंटरमध्ये दाखल होऊ शकतील. त्यांना संशयित रूग्णांच्या वॉर्डात ठेवले जाईल.

आरोग्य मंत्रालयाच्या नवीन पॉलिसीत हे नियम आहेत

  • कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या सस्पेक्ट वॉर्डमध्ये दाखल केले जाऊ शकते.
  • कोणत्याही रुग्णाला सेवा नाकारली जाऊ शकत नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधे देखील समाविष्ट आहेत, जरी रुग्ण इतर शहराचा असेल.
  • कोणत्याही रुग्णाला प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. जरी त्याच्याकडे त्या शहराचे वैध ओळखपत्र नसेल, जेथे रुग्णालय आहे. आवश्यकतेनुसार रुग्णालयात प्रवेश देणे अनिवार्य आहे.

कॅश पेमेंटची परवानगी
कोरोना रूग्णांवर उपचार करणारे रुग्णालये, दवाखाने आणि कोविड केअर सेंटर आता दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट रोख घेण्यास सक्षम असतील. शुक्रवारी केंद्र सरकारने त्यास मान्यता दिली. ही सवलत 31 मे पर्यंत असेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस (CBDT)ने नोटिफिकेशन जारी करुन म्हटले की, अशा प्रकारच्या इंस्टीट्यूटला रुग्ण आणि पेमेंट करणाऱ्याचे पॅन किंवा आधार कार्ड घ्यावे लागेल. यासोबतच रुग्ण आणि पेमेंट करणाऱ्यामध्ये काय नाते आहे ही माहिती देखील घ्यावी लागेल.

CBDT ने म्हटले की, या आदेशाच्या व्याप्तीमध्ये रुग्णालये, नर्सिंग होम, कोविड केअर सेंटर किंवा कोरोनावर उपचार करणार्‍या इतर तत्सम वैद्यकीय सुविधा समाविष्ट असतील. ते सर्व रुग्णांकडून आयकर अधिनियम, 1961 ची कलम 269ST नुसार रोख पेमेंट घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...