आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUBG हत्याकांडात कट कारस्थानाचा संशय:आरोपी मुलगा काउंसलरला म्हणाला - एक काका पप्पांशी बोलणे करवून देतात

लखनऊ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

' येथील रुग्णालयात तैनात एक व्यक्ती माझ्या वडिलांचे मित्र आहेत. ते माझे त्यांच्याशी बोलणे करवून देतात. पप्पा मला संपूर्ण गोष्टी सांगतात,' अशी थक्क करणारी माहिती आपल्या आईची हत्या करणाऱ्या 16 वर्षीय मुलाने बालसुधारगृहाच्या समुपदेशन पथकाशी बोलताना दिली. त्यामुळे या पथकाने आपल्या अहवालात मृत साधना सिंह यांच्या हत्येसाठी वडिलांनीच या मुलाला प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

समुपदेशकांनी मुलाला तुला बाहेरची माहिती कशी कळते, असा प्रश्न केला असता मुलाने माझे वडिलांशी नियमित बोलणे होत असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला -माझे वडिलांशी नियमित बोलणे होते. पुढे काय होणार, याचीही मला संपूर्ण माहिती आहे. आता काउंसलिंग करणारी बालसुधारगृहाची टीम आपला अहवाल तयार करत आहे. त्यात त्यांनी वडिल नवीन यांच्यावरच पत्नीची हत्या करण्यासाठी मुलाला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे.

हे चित्र 8 जूनचे आहे. फौजी नवीन रडत असताना कुटुंबातील सदस्य त्यांना धीर देत होते.
हे चित्र 8 जूनचे आहे. फौजी नवीन रडत असताना कुटुंबातील सदस्य त्यांना धीर देत होते.

आरोपी मुलगा म्हणाला - करायचे होते ते केले

मुलगा टीमला म्हणाला -मला करायचे होते ते मी केले. आता कुटुंबातील चर्चा, माध्यमांतील बातम्या व पोलिसांच्या कारवाईने काहीच फरक पडणआर नाही. मुलाचे हे बोलणे ऐकूण काउंसलरही थक्क झाले. कारण, मुलाला न्यूज चॅनल व वृत्तपत्रापासून दूर ठेवण्यात येत होते. त्यानंतरही त्याला बाहेर सुरू असणाऱ्या घडामोडींची खडा न खडा माहिती होती.

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची तक्रार

त्यामुळे नवीन यांचा मुलाशी होणारा संवाद हा एका कटाचा भाग माणून टीमने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. तूर्त त्या कर्मचाऱ्याची चौकशी करुन त्याच्या फोन कॉल्सचे डिटेल्स शोधले जात आहेत.

इनपूटद्वारे लखनऊच्या कथित पबजी हत्याकांडातील आरोपी मुलाला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिस कारवाईपासून कुटुंबात सुरू असलेली चर्चा व माध्यमांत येणाऱ्या प्रत्येक बातमीची त्याला चार भींतीच्या आत माहिती मिळत आहे.

आरोपी मुलावर कॅमेऱ्याची नजर

वयाच्या 16 व्या वर्षी स्वतःच्या आईची हत्या करणारा हा मुलगा बालसुधारगृहातील इतर मुलांसाठीही धोका मानला जात आहे. त्यामुळे त्याला लहान मुलांपासून दूर ठेवले जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे त्याच्यावर सतत नजर ठेवण्यात येत आहे. बालसुधारगृहाचे अधीक्षक म्हणाले, 'येथे एकूण 120 मुले आहेत. लहान मुलांसाठी खाली व 15 वर्षांवरील मुलांसाठी पहिल्या मजल्यावर मुलांसाठी खोल्या आहेत. या मुलाला खालच्या मजल्यावरच इतर मुलांपासून दूर ठेवण्यात आले आहे.'

मुलगी म्हणाली - भावाला गोळी मारताना पाहिले नाही

घटनेच्या रात्री म्हणजेच ७ जून रोजी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
घटनेच्या रात्री म्हणजेच ७ जून रोजी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

लखनऊच्या PUBG हत्याकांडातील 10 वर्षांच्या निष्पाप मुलीने आईच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी तिचे मौन सोडले. ती म्हणाली - 'मी माझ्या भावाला गोळीबार करताना पाहिले नाही. एकच आवाज ऐकू आला. आई बेडवर पडली होती. रक्त पसरले होते. भावाने माझे तोंड दुसरीकडे वळवले आणि मला पुढच्या खोलीत नेले. मला तिथे सोडून तो स्कूटी घेऊन बाहेर गेला. ती काही वेळ तिथेच बसून राहिले. मग आईच्या खोलीत गेले. मी दार उघडले तर आई बेडवर तडफडत होती. मी जवळ जाऊन तिला स्पर्श केला. मिठी मारणारच होते की भाऊ आला. काही समजत नव्हते. मी धावतच पुन्हा खोलीत परत गेले.'

बातम्या आणखी आहेत...