आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणी मृतावस्थेत:‘बोले रे पपीहरा’च्या गायिका वाणी जयराम यांचा संशयास्पद मृत्यू

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बोले रे पपीहरा’सारखे लोकप्रिय गीत गाणाऱ्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम (७७) यांचे शनिवारी निधन झाले. त्या अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत. हिंदी-मराठीसह १९ भाषांमध्ये १० हजारांहून अधिक गाणी गायलेल्या जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण जाहीर झाला होता. शनिवारी सकाळी त्यांची मोलकरीण कामासाठी आल्यावर दार बंद दिसले. तिने बेल वाजवल्यानंतरही बराच वेळ दार उघडले गेले नाही. त्यामुळे तिने वाणी यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी दार तोडले असता वाणी मृतावस्थेत आढळल्या. पण त्यांच्या कपाळावर जखमा आढळल्या.

बातम्या आणखी आहेत...