आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Suvendu Adhikari, Brother Accused Of Stealing Relief Material Case Filed In West Bengal; News And Live Updates

शुभेंदूवर चोरीचा आरोप:ममता बॅनर्जींना पराभूत करणाऱ्या शुभेंदू अधिकारींसह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल; सरकारी साहित्य चोरून नेण्याचे प्रकरण

कोलकता14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय सशस्त्र दलांचा देखील वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्यावर काठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नगरपालिकामधून सरकारी साहित्य चोरुन नेण्याचे आरोप लावण्यात आले आहे. हा गुन्हा काठी नगरपालिका प्रशासकीय मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी 1 जून रोजी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

सोमेंदू अधिकारी हे काठी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान, शुभेंदू अधिकारी हे तेच नेते आहेत, ज्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. शुभेंदू आधी तृणमूलमध्येच होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

केंद्रीय सशस्त्र सेनेचा वापर करण्यात आला
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शुभेंदू अधिकारी आणि त्यांचा भाऊ सोमेंदू यांच्या सांगण्यावरुन 29 मे रोजी दुपारी 12.30 नगरपालिका कार्यालयाच्या गोदामाचे कुलूप जबरदस्तीने उघडले व त्यामधून सरकारी साहित्य चोरुन नेले. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी चोरीच्या वेळी केंद्रीय सशस्त्र दलांचा देखील वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...