आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swachh Bharat Abhiyan 2.87 Lakh Crore, Plumbing To 100% Of Households; Starting At The Hands Of Prime Minister Modi

एसबीएम-यू 2.0:स्वच्छ भारत अभियान 2.87 लाख कोटींचे, 100 % घरांना नळ जोडणी; पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रारंभ, शहरे होणार कचरामुक्त

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिड्यूस, रियुज, रिसायकलचे उद्दिष्ट

स्वच्छ भारत मिशन या शहरातील (एसबीएम-यू) दुसऱ्या टप्प्याचा शुक्रवारी आरंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाची सुरुवात झाली. अर्बन २.० व अमृत २.० च्या कार्यक्रमात मोदी म्हणाले, २०१४ मध्ये नागरिकांनी खुल्या जागेत शौचमुक्तीचा संकल्प केला होता. त्यानुसार १० कोटींहून जास्त शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० चे उद्दिष्ट आहे. कचरामुक्त शहरांतील १०० टक्के घरांना पेयजलाची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. कचऱ्याचे ढिगारे दिसतात. त्याची सफाई करण्याचे उद्दिष्ट आहे. २.८७ लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यात गटारे,सुरक्षा व्यवस्थापनासह अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे.

मिशनमुळे विविध शहरांतील १०.५ कोटी लोकांना लाभ मिळणार

देशातील शहरांचा कायापालट

  • 4700 शहरी भागात काम होणार
  • 2.68 कोटी नळ जोडण्या दिल्या जाणार. 500 अमृत शहरांचा समावेश.
  • 2.64 कोटी घरांसाठी सांडपाणी व्यवस्था.

सात वर्षांत ४ लाख कोटी रुपये मोहिमेवर खर्च
२०१४ नंतर रालोआ सरकारने शहरी विकासावर सुमारे ४ लाख कोटी रुपये खर्च केले. शहरातील गरिबांसाठी निवास आणि नवीन मेट्रो सेवा हा याच कार्यक्रमाचा भाग आहे. ही सेवा सुरू झाली आहे. पीएम स्ट्रीट व्हेंडर योजनेनुसार विविध बँकांकडून सुमारे २५०० काेटी रुपयांची रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात आली आहे.

१०० टक्क्यापर्यंत दैनंदिन कचरा प्रक्रियेचे उद्दिष्ट
पंतप्रधान म्हणाले, २०१४ मध्ये मोहिम सुरू केली होती. तेव्हा दररोजच्या कचऱ्यापैकी २० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होत. आज मात्र सुमारे ७० टक्के दैनंदिन कचरा प्रक्रिया शक्य होत आहे. आता हे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आहे. मिशन २.० अंतर्गत शहरांना कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे.

आता अस्वच्छतेबद्दल लहान मुले मोठ्यांना सुनावतात..
पंतप्रधान म्हणाले, स्वच्छता अभियानाची जबाबदारी आपल्याकडे तरुणांनी घेतली आहे. लहान-लहान मुलेदेखील आता मोठ्यांना घाण करू नये, असे सुनावतात. स्वच्छता प्रत्येक घर, प्रत्येक दिवशी झाली पाहिजे.

मिशन, मान व मर्यादा
या योजनेत मिशनही आहे. मान आणि मर्यादाही आहे. स्वच्छ भारत अभियान, अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास प्रत्येक नागरिकासाठी अभिमान वाटावा अाहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातम्या आणखी आहेत...