आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swachh Vidyalaya Award To 39 Schools Across The Country; 3 Schools In Maharashtra Were Felicitated

स्वच्छतेचे मूल्यांकन:देशभरातील 39 शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार; महाराष्ट्रातील 3 शाळांचा गौरव करण्यात आला

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे शनिवारी देशभरातील ३९ शाळांना २०२१-२२ साठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार देण्यात आला. त्यापैकी २१ शाळा ग्रामीण भागांतील आणि १८ शहरी भागांतील आहेत, तर २८ सरकारी आणि ११ खासगी शाळा आहेत. महाराष्ट्रातील ३ शाळांचा गौरव करण्यात आला आहे. पुरस्कार पटकावणाऱ्या सरकारी शाळांत दोन कस्तुरबा बालिका विद्यालये, एक नवोदय विद्यालय आणि तीन केंद्रीय विद्यालये आहेत.स्वच्छ विद्यालय पुरस्काराच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ८.२३ लाख शाळांनी प्रवेशिका पाठवल्या.संपूर्ण श्रेणीत ६० हजार रु. आणि उपश्रेणीत २० हजार रु.चा पुरस्कार दिला आहे.

मूल्यांकन ६ श्रेणीवर होते
शाळांचे मूल्यांकन ६ श्रेणीत केले जाते. या श्रेणीत ११० गुण आहेत. स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेसाठी २२, शौचालयासाठी २७, साबणाने हात धुण्यासाठी १४ गुण आहेत. व्यवस्थेचे संचालन आणि देखभालीसाठी २१, स्वच्छतेबद्दल जागरूक करणे, वर्तणुकीत बदल आणि क्षमतेचे ११ तसेच कोविड-१९ बचावाच्या उपायांचे १५ गुण आहेत.

बातम्या आणखी आहेत...