आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहजहानपूरमधील 11 वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाला आहे. न्यायालयापुढे हजर न झाल्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे.
कोर्टाने चिन्मयानंद यांच्या घराबाहेर वा सार्वजनिक ठिकाणी नोटीस डकवण्याचे आदेश दिलेत. अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतरही चिन्मयानंद कोर्टात हजर झाले नाही. या प्रकरणी त्यांच्या वकिलांनी ते आजारी असल्याचा युक्तिवाद केला. पण बचाव फिर्यादी पक्षाने त्यावर हरकत नोंदवली. त्यानंतर कोर्टाने चिन्मयानंदच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळला.
11 वर्षांपूर्वी शिष्येने दाखल केला होता रेपचा गुन्हा
माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर 11 वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्येने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अपर मुख्य न्यायदंडाधिकारी तृतीय MP-MLA कोर्ट असमा सुल्ताना यांनी चिन्मयानंद यांच्याविरोदात 30 नोव्हेंबर रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. पण चिन्मयानंद कोर्टापुढे हजर झाले नाही. त्यानतंर कोर्टाने त्यांना फरार घोषित करत कलम 82 अंतर्गत कारवाई करणे व आदेशाची प्रत चिन्मयानंद यांच्या घराबाहेर व एखाद्या सार्वजनिक ठिकाणी डकवण्याचे आदेश दिले.
सुप्रीम कोर्टानेही दिले होते हजर होण्याचे आदेश
या प्रकरणी चिन्मयानंद यांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टानेही 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांना कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यावर त्यांच्या वकिलांनी चिन्मयानंद आजारी असल्याचा युक्तिवाद केला होता. पण फिर्यादी पक्षाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 16 जानेवारीपर्यंत स्थगित केली.
खटला मागे घेण्यासाठी यूपी सरकारने केला होता अर्ज
चिन्मयानंद यांच्यावर चौक कोतवाली येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 मार्च 2018 रोजी उत्तर प्रदेश सरकारने खटला मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु पीडित पक्षाने न्यायालयात अर्ज दाखल करून आक्षेप नोंदवला, त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारचा अर्ज फेटाळला.
आधी जामीन, नंतर अजामिनपात्र वॉरंट जारी
चिन्मयानंद हजर न झाल्यामुळे कोर्टाने आधी जामीनपात्र, नंतर अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. चिन्मयानंद सुप्रीम कोर्टात गेले, पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. चिन्मयानंद यांना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.