आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी केंद्रीय मंत्र्याच्या केसमध्ये यूटर्न:चिन्मयानंदवर बलात्काराचा आरोप करणार्‍या तरुणीने फिरवली साक्ष, वकीलाने तिच्याविरोधात कोर्टात अर्ज दाख केला

लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 सप्टेंबर 2019 ला पोलिसांनी आरोपी चिन्मयानंदला आश्रमातून अटक केले होते

यूपीच्या शाहजहांपूरमध्ये एलएलएम विद्यार्थ्यींचे लैंगिक शोषणाच्या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. मंगळवारी पीडित मुलीने न्यायालयात साक्ष देताना माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद उर्फ कृष्णपाल सिंहविरोधात लावलेले आरोप मागे घेतले. यामुळे तिच्या वकीलाने तिला साक्ष फिरवणारी (Hostile) घोषित करुन तिच्याविरोधात सीआरपीसी कलम 340 अंतर्गत खटला दाखल केला.

मागच्या वर्षी 24 ऑगस्टला स्वामी शुकदेवानंद लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एलएलएमच्या विद्यार्थीनीने एक व्हिडिओ व्हायरल करुन चिन्मयानंदवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले होते. हे डिग्री कॉलेज चिन्मयानंदचेच आहे. पीडितेच्या वडिलांनी शाहजहांपुरमधील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी चिन्मयानंदचे वकील ओम सिंहने एका अज्ञात मोबाइल नंबरवरुन 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार दाखल केली होती.

चिन्मयानंदला मागच्या वर्षी आश्रमातून अटक झाली होती

लैंगिक शोषणातील आरोपी चिन्मयानंदला 20 सप्टेंबरल 2019 ला मुमुक्ष आश्रमातून अटक झाली होती. एसआयटीने यूपी पोलिसोबत मिळून चिन्मयानंदला अटक केली होती. याप्रकरणी 4 नोव्हेंबर 2019 ला एसआयटीने चिन्मयानंदविरोधात चार्जशीट दाखल केली होती. त्याच्यावर भादंवि कलम 376(सी), 354(डी), 342 आणि 506 लावली होती. 13 पानांच्या चार्जशीटणध्ये 33 साक्षीदारांची नावे 29 लिखीत पुराव्यांची यादी दिली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser