आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरीमगंजचे मोटार मेकॅनिक नुरुल हक शुक्रवारी जुन्या मारुती स्विफ्टचे लॅम्बोर्गिनीत रुपांतर करून गुवाहाटीला पोहोचले. तिथे त्यांनी ही गाडी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांना एक मॉडिफाइड लॅम्बोर्गिनी कार भेट म्हणून मिळाली आहे. ही कार मारुती स्विफ्टला मॉडिफाइड करून तयार करण्यात आली आहे. इनोव्हेटर नुरुल हक यांनी ही कार गिफ्ट केली. त्यानंतर सरमा यांनी एका ट्विटद्वारे नुरुल यांचे आभार मानले.
शनिवारी केलेल्या एका ट्विटमध्ये सरमा म्हणाले - "अनीपूर, करीमगंजचे इनोव्हेटर नुरुल हक यांच्याकडून एक मॉडिफाइड लॅम्बोर्गिनीसारखी दिसणारी एक कार स्वीकारून आनंद झाला. त्यांच्या भविष्यातील सर्वच प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
मुख्यमंत्री सरमा यांनी कछार दौऱ्यात सिलचरमध्ये हक यांची लॅम्बोर्गिनी पाहिली होती. सिलचरमध्ये हक यांना भेटल्यानंतर ते म्हणाले होते - "करीमगंजच्या नुरुल हक नामक उत्साही तरुणाने तयार केलेली लॅम्बोर्गिनी चालवणे अत्यंत रोमांचक अनुभव होता."
4 महिने व 10 लाखांत तयार झाली कार
करीमगंजच्या भांगा भागात राहणारे मोटार मेकॅनिक हक यांनी सांगितले की, या प्रोजेक्टवर 10 लाखांहून अधिकचा खर्च आला. हक यांची नेहमीच लॅम्बोर्गिनीसारखी स्पोर्ट्स कार चालवण्याची इच्छा होती. ते दीमापूरमध्ये (नागालँड) मोटार मेकॅनिक म्हणून काम करत होते. तेथूनच त्यांनी कार मॉडिफाइड करणे सुरू केले.
गतवर्षीही त्यांनी एक कार लॅम्बोर्गिनीसारखी मॉडिफाइड केली होती. यावेळी त्यांना एक जुनी स्विफ्ट कार लॅम्बोर्गिनीमध्ये बदलण्यास जवळपास 4 महिन्यांचा कालावधी लागला.
फेरारीसारखी कार बनवण्याची इच्छा
हक यांनी एएनआयला बोलताना सांगितले की, "माझी फेरारी सारखी कार मॉडिफाइड करण्याची इच्छा आहे. सरकारने मदत केली, तर मी या प्रकरणी अनेक वाहने मॉडिफाइड करण्याचा उद्योग करेल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.