आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्विगीने 2022 मध्ये आपल्या अॅपवर भारतीयांनी सर्वाधिकि ऑर्डर केलेल्या डिशची लिस्ट शेयर केली आहे. त्यानुसार, 2022 मध्ये चिकन बिर्याणी सर्वाधिक ऑर्डर करण्यात आली. खास गोष्ट म्हणजे मागील 7 वर्षांत भारतात बिर्याणीचीच सर्वाधिक ऑर्डर करण्यात आली. बंगळुरूच्या एका व्य्तीने स्विगी इन्स्टामार्टहून 16 लाख रुपयांचे किराणा सामान मागवल्याचा खुलासाही कंपनीने केला आहे.
स्विगीच्या मते, अन्नावरील प्रेमाहून कोणतेही प्रेम मोठे नाही. कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या ऑर्डर लिस्टमधून याची प्रचिती येते. बंगळुरूच्या एका व्यक्तीने दिवाळीला 75,378 रुपयांचे जेवण ऑर्डर केले. तर पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या टीमसाठी 71,229 रुपयांचे बर्गर व फ्राइजची ऑर्डर दिली. पण आतापर्यंत बंगळुरूच्या एका व्यक्तीची कुणालाही बरोबरी करता आली नाही. या व्यक्तीने स्विगीवरून तब्बल 16 लाख रुपयांचे किराणा सामान मागवले होते.
सर्वाधिक ऑर्डर केल्या जाणाऱ्या डिशची लिस्ट
चिकन बिर्याणी भारतात सर्वाधिक ऑर्डर केल्या जाणाऱ्या डिशमध्ये अग्रस्थानी आहे. तंदुरी व मोगलाई डिशसह स्विगीने भारतीयांनी यंदा जेवणाच्या बाबतीत अनेक प्रयोग केल्याचाही खुलासा केला आहे. ग्राहकांनी यंदा खूप साऱ्या कोरियन व इटालीयन डिशचीही ऑर्डर केली. त्यात इटालीयन पास्ता, पिझ्झा, मॅक्सिकन बाउल, मसालेदार रेमन, सुशी, रॅव्हियोली (इटालीयन) व बिबिंलॅपचा (कोरियन) समावेश आहे.
स्नॅक्समध्ये समोसा, डेझर्टमध्ये गुलाब जामून टॉपवर
स्नॅक्सच्या बाबतीत समोशाची सर्वाधिक ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर पॉपकॉर्न, पाव भाजी, फ्रेन्च फ्राइज व गार्लिक ब्रेडही लोकांच्या पसंतीस उरले. डेझर्टमध्ये लोकांनी सर्वाधिक गुलाम जामूनवर ताव मारला. त्यानंतर रसमलाई, चॉकलेटही ऑर्डर करण्यात आले.
सर्वाधिक वेगवान ऑर्डर 1.03 मिनिटांत
स्विगीने शेयर केले आहे की, आतापर्यंत इन्स्टामार्टच्यावतीने सर्वात वेगवान ऑर्डर अवघ्या 1.03 मिनिटांत देण्यात आली. हा ग्राहक स्टोअरपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर होता. कंपनीने सांगितले की, ग्राहकांनी स्विगी इन्स्टामार्टहून इंस्टंट नूडल्स व दूधाच्याही खूप साऱ्या ऑर्डर दिल्या. याशिवाय इन्स्टामार्टवर 3,62,10,084 चिप्सचीही ऑर्डर देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.