आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशपाळणा तुटून वीजेच्या तारेवर पडला:बिहारच्या जगप्रसिद्ध सोनपूर जत्रेतील दुर्घटना, झुल्यातून पडलेल्यांना गंभीर दुखापत

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगप्रसिद्ध सोनपूर जत्रेत रविवारी मोठा अपघात झाला आहे. आकाशपाळणा तुटून वीजेच्या तारेवर पडला. त्यात बसलेले 6 जण जमिनीवर पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांवर सोनपूर येथे उपचार सुरू आहेत.

रविवार असल्याने जत्रेत मोठी गर्दी होती. जत्रेतील सर्वात मोठ्या पाळण्याचा व्हील सेट तुटला. तो तुटल्याने 6 जण खाली पडले. घाईघाईत स्विंग थांबवण्यात आली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यातील चार जखमींना तेथे दाखल करण्यात आले. गंभीररित्या जखमी झालेल्या अमन खानला पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे.

चेंगराचेंगरी झाली
आकाशपाळणा तुटल्याचा आवाज ऐकून एकच खळबळ उडाली. लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींमध्ये रुख़सार खानम (31 वर्ष) ,गिरीश कुमार (55 वर्ष) , अमन खान (19 वर्ष), अमन खान (18 वर्ष) , रत्नेश कुमार(18 वर्ष) आणि राम विनोद प्रसाद राय( 60 वर्ष) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

सोनपूर जत्रा दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला (नोव्हेंबर-डिसेंबर) बिहारच्या सोनेपूर येथे भरते. ही आशिया खंडातील सर्वात जत्रा असते. याला छत्तर मेळा असेही म्हणतात. बिहारची राजधानी पाटणापासून 25 किमी आणि हाजीपूरपासून 3 किमी अंतरावर सोनपूर येथे गंडकच्या काठावर ही जत्रा भरते.

बातम्या आणखी आहेत...