आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tablighi Jamaat : Owaisi Said, "Everything Is Being Used To Demonize Muslims In India".

तबलिगी जमात प्रकरण:भारतात मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत - असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृह मंत्रालयानुसार, तबलिगी जमातीशी संबंधित लोकांची 17 राज्यांत 1023 प्रकरणे, 22 हजार लोक क्वारंटाइन

देशभरात रविवारपर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांपैकी 30% लोक तबलिगी जमातच्या मरकजहून परतलेल्या लोकांमुळे संक्रमित झाले होते. गृह मंत्रालयानुसार, तबलिगी जमातीशी संबंधित लोकांची 17 राज्यांत 1023 प्रकरणे आहेत. जमातचे कामगार आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22 हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी एका पत्रकाराने एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना जमात कार्यक्रमाचा निषेध करण्याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले की, भारतात मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.   त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, "भारतात मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आमची वेश-भूषेपासून आमचे खाणे-पिणे आणि व्यवसायाचा यासाठी उपयोग केला जात आहे. या पक्षपाताचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम नाहीत. मला एक मुस्लिमाच्या रुपातच का निंदा करण्यास सांगितले जाते? हिंदुत्वाचे नाव घेऊन अशा गोष्टींचा निषेध करण्यास तुम्हाला कधी सांगितले गेले आहे काय?" असा प्रश्नही ओवेसी यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे. 

जमातला नाही तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा 
ओवेसी म्हटले की, "तबलिगी जमातचा कार्यक्रम याआधीही होत होता. मात्र आज त्याला बदनाम केले जात आहे. संसदेपासून अयोध्येत मूर्ती स्थापनेपर्यंत काय नाही झाले. हा बहुलपणाचा दुहेरी मानदंड आहे. जेव्हा समान संधी मैदानात नसतात तेव्हा समान सहभागासाठी विचारणे योग्य नाही." यासोबत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "हा प्रश्न सत्तेत असलेल्यांना विचारला पाहिजे. बहुसंख्य भारतीय नागरिक असलेल्या जमातला नाही. मात्र त्यांच्यासोबत असा व्यवहार केला जात नाही."

तबलिगी जमातमधील संक्रमित लोक17 राज्यात आढळले

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, तबलिगी जमातीशी संबंधित प्रकरणे 17 राज्यांत मिळाली आहेत. देशातील एकूण संक्रमितांपैकी 1023 प्रकणे तबलिगी जमातीची आहेत. हे लोक तमिळनाडू, दिल्ली, तेलंगाणा, आंधप्रदेश, कर्नाटक, अंदमान निकोबार, उत्तराखंड, केरळ, अरुणाचल प्रदेश, हरियाणासह इतर राज्यांमध्ये आहेत. यांच्या संपर्कात आलेल्या 22 हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...