आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ताज महलात बॉम्ब असल्याचे वृत्त खोटे निघाले आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशननंतर ही माहिती दिली. ताज परिसर पर्यटकांसाठी पुन्हा उघडण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फोन करुन बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्याची ओळख पटली आहे. त्याने फिरोजाबाद येथून फोन केला होता. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी ताज महलात बॉम्ब असल्याच्या वृत्तानंतर पर्यटकांना बाहेर काढण्यात आले होते. ताज महलचे दोन्हीही दरवाजे बंद करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, 'बॉम्ब ठेवल्याची सूचना एका अज्ञात व्यक्तीने 112 नंबरवर दिली होती. त्याने म्हटले की, सैनिक भर्तीमध्ये घोळ होत आहे. यामुळे त्याची भर्ती होऊ शकली नाही. त्याने ताज महलमध्ये बॉम्ब ठेवला आहे. तो थोड्याच वेळात फुटेल.'
आम्ही ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.