आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरन्यायाधीश उदय लळीत मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. मंगळवारी श्री गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने लळीत यांना सोमवारी एका शानदार समारंभात निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी नियोजित सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.बेला त्रिवेदी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयातील ३७ वर्षांचा प्रवास अविस्मरणीय ठरला. याच न्यायालयात माझ्या कारकीर्दीला सुरुवात झाली आणि इथेच त्याला विराम िमळतोय. ज्या न्यायमूर्तींसमोर (न्या.यशवंत चंद्रचूड) मी प्रथमच खटला लढवला त्यांचे पुत्र (न्या.धनंजय चंद्रचूड) हे उत्तराधिकारी असतील यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते, अशा शब्दांत मावळते सरन्यायाधीश लळीत यांनी निरोप समारंभाला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांना केवळ एकदाच विरोध केला असे चंद्रचूड म्हणाले मात्र याबद्दल अधिक भाष्य करणे चंद्रचूड यांनी टाळले. सर्वोच्च न्यायालयातील रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न सर न्यायाधीश लळीत यांनी केला होता परंतु न्या.चंद्रचूड आणि न्या.एस.ए.नजीर यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. कॉलेजियमच्या प्रस्तावावर लेखी सहमती देण्यास दोघांनीही विरोध केला होता
लळीत यांनी ७३ दिवस सरन्यायाधीशपद भूषवले १३ ऑगस्ट २०१४ रोजी उदय लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली होती. २७ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. २ महिने १२ दिवस (७३ दिवस) त्यांनी सरन्यायाधीशपद भूषवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.