आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Take Decision On ASI Survey Of Disputed Site Within 4 Months, Court Orders In Krishna Janmabhoomi Case

कोर्टाचे निर्देश:वादग्रस्त स्थळाच्या एएसआय सर्व्हेवर 4 महिन्यांत निर्णय घ्या , कृष्ण जन्मभूमीप्रकरणी कोर्टाचे निर्देश

अलाहाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेच्या न्यायालयाला श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशिदीचे एएसआयद्वारे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या अर्जावर ४ महिन्यांत आदेश देण्यास सांगितले आहे. श्रीकृष्ण विराजमान व आणखी एकाच्या याचिकेवर कोर्टाने सोमवारी हा निर्देश देऊन याचिका निकालात काढली.

याचिकेत मथुरा न्यायालयात एएसआयच्या सर्व्हेसाठी प्रलंबित याचिकेवर त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली. वादग्रस्त परिसर भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान आहे, तेथे आधी मंदिर होते आणि ते पाडून शाही ईदगाह बनवण्यात आला, असा दावा केला आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबत अनेक दशके जुना वाद आहे. १३.३७ एकर जमिनीच्या मालकीच्या मागणीसाठी मथुरा कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत संपूर्ण जमीन घेण्याची आणि श्रीकृष्ण जन्मभूमीला लागून असलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने वादग्रस्त स्थळाची व्हिडिओग्राफी आणि फोटाेग्राफी करण्याचीही मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...