आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Take Petition Against Chandrachud Dismissed Court Opined That The Petition Was Filed Out Of Misunderstanding

न्या. चंद्रचूडविरोधातील याचिका फेटाळली:याचिका गैरसमजातून दाखल करण्यात आली असल्याचे न्यायालयाचे मत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापासून रोखावे, अशा आशयाची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका गैरसमजातून दाखल करण्यात आली असल्याचे मत न्यायालयाने मांडले.

विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या निवृत्तीनंतर न्या.चंद्रचूड यांचा येत्या ९ नोव्हेंबर रोजी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथविधी होणार आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार होती, परंतु सरन्यायाधीश उदय लळीत यांनी बुधवारीच सुनावणी घेतली. याबद्दल वकिलांचे म्हणणे ऐकले. ही याचिका सुनावणीसाठी योग्य नाही, असे न्यायालयाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...