आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्किस बानो प्रकरण सुनावणी:न्या. त्रिवेदी स्वत:हून बाहेर ; सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम.त्रिवेदी यांनी मंगळवारी बिल्किस बानोद्वारे दाखल याचिकेच्या सुनावणीतून स्वत:ला बाजूला केले. बिल्किस यांनी आपल्यावरील सामूहिक अत्याचार आणि कुटुंबीयांच्या हत्येत ११ दोषींची शिक्षा माफ करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. अजय रस्तोगी आणि न्या. त्रिवेदी यांच्या पीठाने मंगळवारी सकाळी याची सुनावणी सुरू केली. सुनावणी सुरू होताच न्या. रस्तोगी म्हणाले, त्यांचे सहकारी या प्रकरणाची सुनावणी करू इच्छित नाहीत.

बातम्या आणखी आहेत...