आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींच्या हस्ते विधी:न्या. उदय लळीत यांनी 49 वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्या. उदय उमेश लळीत यांनी शनिवारी ४९ व्या सरन्यायाधीशांच्या रूपात शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ ७४ दिवस असेल. १०० दिवसांपेक्षा कमी कार्यकाळ मिळणारे ते सहावे सरन्यायाधीश असतील. शपथग्रहणानंतर सरन्यायाधीशांनी वडील सेवानिवृत्त न्यायमूर्ती उमेश रंगनाथ लळीत यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. राष्ट्रपती भवनात आयोजित शपथविधी समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री तसेच सेवानिवृत्त सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...