आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taliban Afghanistan Kabul Capture LIVE Update; Indian Evacuation From Afghanistan Latest News And Updates

तालिबानी राज:काबुल येथून दिल्लीत पोहोचले 78 लोक, 25 भारतीय नागरिकांसह 46 अफगाणी शिखांचा आहे समावेश; डोक्यावर ठेवून केंद्रीय मंत्र्यांनी राखला गुरूग्रंथ साहिबचा मान

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जा दरम्यान काबूलमधून भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज एअर इंडियाचे AI-1956 विमान 78 लोकांना घेऊन ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथून दिल्लीला पोहोचले आहे. यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि 46 अफगाण शिखांचा समावेश आहे. काबूलच्या गुरुद्वारांमधून काढलेले तीन गुरु ग्रंथ साहिब देखील या विमानात आणण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, व्ही मुरलीधरन आणि भाजपा नेते आरपी सिंह हे दिल्ली विमानतळावर या गुरु ग्रंथ साहिबचे स्वरूप हाताळण्यासाठी आले होते, हे गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घेऊन विमानतळाबाहेर आणत आहेत.

गुरु ग्रंथ साहिबच्या या प्रती नगर-कीर्तनासह दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये नेल्या जातील. यासाठी खास पालखी साहिबही तयार करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट
तालिबानच्या तावडीतील देश सोडलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा दावा त्यांचे भाऊ हशमत गनी यांनी केला आहे. हशमत यांच्या मते, काबुलमध्ये रक्तपात करून आणखी हिंसक परिस्थिती बनवण्याचा कट होता. याच हिंसाचाराच्या आड लष्कराचे काही माजी अधिकारी गनी यांची हत्या करणार होते.

काही दिवसांपूर्वीच हशमतने तालिबानमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले होते.
काही दिवसांपूर्वीच हशमतने तालिबानमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले होते.

तालिबान सरकार मान्य, त्यात सहभागी होणार नाही -हशमत
त्या लोकांनी आपल्याला देखील मारण्याचा प्रयत्न केला असे हशमत यांनी सांगितले आहे. हशमतने न्यूज चॅनल WION शी बातचीत करताना हा दावा केला. पण, अशरफ गनी यांची हत्या कोण करणार होते त्यांची नावे हशमत यांनी घेतलेली नाहीत. याबद्दल विचारले असता या नावांचा खुलासा स्वतः अशरफ गनी करतील असे हशमत यांनी सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच हशमतने तालिबानमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समोर आले होते. यासंदर्भात फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. त्यावर बोलताना आपण तालिबान सरकार मान्य केले पण, त्यात सहभागी होणार नाही असे हशमतने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...