आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taliban Afghanistan Kabul LIVE Update; Panjshir News | Pakistan | US Military | Afghan New Government; News And Live Updates

तालिबानी राजवट:दिल्लीमध्ये तालिबान आणि पाकिस्तानविरोधात झळकले फलक, अफगाण महिला आणि मुलांचे जोरदार निदर्शने

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानने पंजशीरच्या दोन बड्या नेत्यांचीही केली आहे हत्या

तालिबानी राजवट आणि त्याच्या क्रूरतेविरोधात केवळ काबूलमध्येच नव्हे तर जगभरात निदर्शने होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाले. तर दुसरीकडे, दिल्लीत राहणाऱ्या अफगाणांनीही शुक्रवारी तालिबान सरकारचा निषेध केला. दरम्यान, या निदर्शनात महिला आणि मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. निदर्शकांनी पंजशीरमध्ये तालिबानविरोधात लढणाऱ्या अहमद मसूदला पाठिंबा देत तालिबान आणि पाकिस्तानचा विरोध केला.

दिल्लीतील एका प्रदर्शनात एक अफगाणी मुलगा तालिबान मुर्दाबादच्या घोषणा देताना दिसला.
दिल्लीतील एका प्रदर्शनात एक अफगाणी मुलगा तालिबान मुर्दाबादच्या घोषणा देताना दिसला.

या विरोध प्रदर्शनात 'तालिबान मुर्दाबाद', 'अफगाणिस्तान तालिबान्यांसाठी नाही', 'आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे', 'पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो', 'पाकिस्तानवर बंदी घातली पाहिजे' अशा स्वरुपाचे फलक दिल्लीत झळकत होते. अफगाणी नागरिक आपल्या स्वातंत्र्यासाठी दिल्लीत मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत.

पाकिस्तानविरोधी फलक झळकवताना अफगाण युवक
पाकिस्तानविरोधी फलक झळकवताना अफगाण युवक

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश - अफगाण निदर्शक
दिल्लीत निदर्शने करताना अफगाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने येत तालिबान आणि पाकिस्तानचा निषेध केला. यादरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रना आयएसआयचे प्रमुख फैज हमीद यांच्या फोटोसह निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो असे आरोपही करण्यात आले.

तालिबानने पंजशीरच्या दोन बड्या नेत्यांचीही केली आहे हत्या
तालिबानने काही दिवसांपूर्वी पंजशीर येथे विजयाचा दावा केला होता. त्याने पाकिस्तानी हवाई दलाच्या मदतीने पंजशीरच्या दोन मोठ्या नेत्यांची हत्या केली होती. तालिबानने नॉर्दर्न अलायन्सचे कमांडर आणि बंडखोर प्रवक्ते फहीम दश्ती आणि जनरल अहमद शाह मसूद यांचा पुतण्या जनरल वदुद यांना ठार केले, जे पंजशीरचे शेर म्हणून ओळखले जातात.

दोन मुले अफगाणिस्तानचा झेंडा हातात घेताना दिसली. या मुलांपैकी एकाने अफगाण सैनिकांचा गणवेश परिधान केला होता.
दोन मुले अफगाणिस्तानचा झेंडा हातात घेताना दिसली. या मुलांपैकी एकाने अफगाण सैनिकांचा गणवेश परिधान केला होता.

घनीने देश सोडल्यानंतर अमरुल्ला सालेहने स्वत: ला राष्ट्रपती घोषित केले होते
तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले. यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. त्याच वेळी, त्यांनी, पंजशीरच्या लढवय्यांसह, राष्ट्रीय प्रतिरोध दलाच्या बॅनरखाली तालिबानविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले.

तालिबानने पंजशीरमधील त्या जागेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे जिथे काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी व्हिडिओ जारी केला होता. अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या दाव्यांचे खंडन करत एक व्हिडिओ जारी केला, ते म्हणाले की ते पंजशीरमध्ये उपस्थित आहेत आणि मृत्यूपर्यंत तेथेच राहतील.

बातम्या आणखी आहेत...