आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taliban Captured Son Of Former Afghan President Abdul Rashid Dostum At Jowzjan Airport News And Live Updates

एक्सक्लूझिव्ह:तालिबान्यांनी अफगाणिस्तानाचे माजी उपराष्ट्रपती यांच्या मुलाचे केले अपहरण, रशीदने एका दिवसापूर्वी घेतली होती राष्ट्रपती अशरफ घनी यांची भेट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोस्तम उत्तर अफगाणिस्तानातील मोठे नेते

अफगाणिस्तानात तालिबानी आणि अफगाण सैन्य यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुर आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम यांच्या मुलाचे जावझान विमानतळावरून अपहरण केले आहे. त्यासोबतच काही अफगाणी सैनिकांनाही कैदी बनवण्यात आले आहे. ही माहिती अफगानिस्तानमध्ये उपस्थित भास्करच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, तालिबान किंवा अफगाणिस्तान सरकारने या घटनेला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

दोस्तम उत्तर अफगाणिस्तानातील मोठे नेते
अब्दुल रशीद दोस्तम यांनी अफगाणिस्तानाच्या उपराष्ट्रपती पदाची धुरा सांभाळली आहे. त्यासोबतच दोस्तम हे उत्तर अफगाणिस्तानातील मोठे नेते असल्याचे मानले जाते. दोस्तम यांच्या मुलाचे अपहरण हा अफगाण सरकारला मोठा धक्का आहे. विशेष म्हणजे दोस्तम यांनी 90 च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये नॉर्दर्न अलायन्सची स्थापना केली होती. याचे अधिकृत नाव युनायटेड इस्लामिक फ्रंट होते.

बुधवारी राष्ट्रपतींनी दोस्तम यांची भेट घेतली
तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहराचा चारी बाजूंनी ताबा मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी बुधवारी मजार-ए-शरीफला भेट दिली. दरम्यान, त्यांनी येथे देशाचे माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम आणि बाल्खचे माजी गव्हर्नर अता मुहम्मद नूर यांच्याशी शहराच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. तालिबान्यांनी मजार शहर ताब्यात घेतल्यास काबूल सरकारसाठी हा मोठा झटका असेल. यापूर्वी 1198 मध्ये तालिबान्यांनी या शहराचा ताबा मिळवला होता. दरम्यान, या कारवाईत 2 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...