आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Taliban Captures Afghanistan| Afghani People Rescued Thank India; News And Live Updates

भारतात परतलेल्या अफगाणांची आपबीती:खासदार रडत म्हणाले - 20 वर्षांत जे काही केलं होतं ते सर्व गेलं; महिलेने सांगितले - तालिबान्यांनी आमच्या घराला आग लावली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 दिवसात 2000 लोकांनी कॉलवर मागितली मदत

अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावरुन मोठ्या संख्येने लोकांना आपल्याला देशात आणले जात आहे. अमेरिकन सैनिकासह इतरही देशांचे सैनिक यासाठी मदत करत आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे विमान 168 लोकांना घेऊन काबूलहून भारतात दाखल झाले. यात 107 भारतीयांचा समावेश असून इतर अफगाण शीख आणि अफगाणी हिंदू आहेत.

भारतीय वंशाचे अफगाणी खासदार नरेंद्र सिंह खालसा, अनारकली होन्यार आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही यामध्ये समावेश आहे. तालिबान्यांनी शनिवारी काबूल विमानतळावरून ज्यांना पळवून नेले होते, त्यांच्यामध्ये होन्यार आणि खालसा यांचा समावेश होता. तुम्ही अफगाणी असल्याने तुम्हाला देश सोडता येणार नाही असं तालिबान्यांनी या लोकांना सुनावलं होतं.

नरेंद्र खालसाचे डोळे आले भरून
भारतीय हवाई दलाचे विमान हिंडन एअरबेसवर उतरल्यानंतर नरेंद्र सिंह खालसा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या उल्लेखाने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. "मी रडत आहे. 20 वर्षांत आम्ही जे काही केले ते सर्व संपले." असे नरेंद्र सिंह खालसा भरलेल्या डोळ्यांनी म्हणत होता. विशेष म्हणजे नरेंद्र सिंह खालसा भारतीय वशांचे अफगाणी खासदार आहेत.

अफगाणी महिलांनी भारतीयांचे मानले आभार
तालिबान्यांनी अफगाणिस्तानाचा ताबा मिळवताच देशाची परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे अनेक अफगाणी नागरिक दुसर्‍या देशात शरणार्थी म्हणून जात आहे. दरम्यान, भारतात आलेल्या एका अफगाणी महिलेने भारतीयांचे आभार मानले आहे. भारतीय लोक आमच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तालिबान्यांनी आमचे घर जाळले असे त्या महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले.

अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडत चालली असल्याचे अफगाण महिलेने सांगितले. म्हणून मी माझी मुलगी आणि दोन नातवंडांसह भारतात आले आहे. आम्हाला मदत केल्याबद्दल मी भारताचे आभार मानते असं तीने म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडत चालली असल्याचे अफगाण महिलेने सांगितले. म्हणून मी माझी मुलगी आणि दोन नातवंडांसह भारतात आले आहे. आम्हाला मदत केल्याबद्दल मी भारताचे आभार मानते असं तीने म्हटले आहे.

सर्व लोकांची RTPCR चाचणी होईल
काबूलमधून भारत देशात येणाऱ्या सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल. दरम्यान, काबूलहून आलेले लोक हिंडन एअरबेसवर बसून आपली चाचणी होण्याची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून येणाऱ्या लोकांना मोफत पोलिओ लसही दिली जात आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्ली विमानतळावरील लस मोहिमेचा एक फोटो ट्विट केला आहे.

अफगाणिस्तानातून येणाऱ्या लोकांना मोफत पोलिओ लसही दिली जात आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्ली विमानतळावर लस मोहिमेचा एक फोटो ट्विट केला.
अफगाणिस्तानातून येणाऱ्या लोकांना मोफत पोलिओ लसही दिली जात आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्ली विमानतळावर लस मोहिमेचा एक फोटो ट्विट केला.

5 दिवसात 2000 लोकांनी कॉलवर मागितली मदत
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलमध्ये 5 दिवसात 2000 पेक्षा जास्त कॉल आले आहेत. विशेष म्हणजे या काळात मंत्रालयाने व्हॉट्सअॅपवर 6000 हजार तर ई-मेलद्वारे 1200 पेक्षा जास्त लोकांच्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...