आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात आता तालिबानी राज:राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती सालेह यांनी सोडला देश, एकेकाळी पाकिस्तानचा प्यादा राहिलेला मुल्ला बरादर बनू शकतो राष्ट्राध्यक्ष

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आला आहे. तालिबान रविवारी काबूलमध्ये दाखल होताच अफगाणिस्तान सरकारने त्यांच्याशी करार करण्यास सहमती दर्शविली. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे. तालिबानच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला बरादर अंतरिम सरकारचे नेतृत्व करू शकतो.

दरम्यान, राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह यांनी देश सोडला आहे. गनी यांच्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले की ते अमेरिकेला जात आहे. तसेच काही तालिबान सूत्रांच्या माहितीनुसार, काबूल पोलिसांनी शरणागती पत्करण्यास सुरुवात केली आहे. ते आपले शस्त्र तालिबान्यांना देत आहे.

कोण आहे मुल्ला मुल्ला बरादर?

मुल्ला बरादार सध्या कतारमध्ये आहेत. सध्या तो कतारमधील दोहा येथील तालिबानच्या कार्यालयाचा राजकीय प्रमुख आहे. राष्ट्रपती होण्यासाठी अनेक लोकांची नावे विचारात घेतली जात आहेत, परंतु त्यांचे नाव सर्वात वर आहे. तो अफगाणिस्तानातील तालिबानचा सहसंस्थापक आहे.

तालिबानचा काबुलच्या चार जिल्ह्यांवर कब्जा

तालिबानने काबुलच्या चार जिल्ह्यांवर कब्जा केला आहे. सारोबी, बगराम, पगमान आणि काराबाग. काबुलमधील नागरिक सांगत आहे की, लोक काबुलमधील घरांवर पांढरे तालिबानी झेंडे लावत आहेत.

काबुलमधील बगराम कारागृहानंतर तालिबान्यांनी पुल-ए-चरखी तुरुंगही तोडून सुमारे 5000 कैद्यांची सुटका केली आहे. पुल-ए-चरखी हे अफगाणिस्तानातील सर्वात मोठे तुरुंग आहे.

बातम्या आणखी आहेत...