आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली तिहार जेलमध्ये बंद असलेले आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्वरीत पावले उचलली जावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे की, मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे जाणून मला दु:ख झाले. वैयक्तिक स्वातंत्र्याची घटनात्मक हक्क हिरावून घेत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.
विरोधकांना त्रास देण्यासाठी केले जाते
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लिहले की, फौजदारी न्याय व्यवस्थेची सर्व तत्त्वे चिरडली जात आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष वैयक्तिक समाधानासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेचा दुरुपयोग करत आहे. गेल्या नऊ वर्षांत केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाने तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे. विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्यासाठी एजन्सीचा वापर केला जात आहे.
'तपास यंत्रणांचा गैरवापर- लोकशाही कधीही मजबूत होणार नाही'
स्टॅलिन म्हणाले की, तपास यंत्रणांचा, राज्यपालांच्या कार्यालयासह घटनात्मक कार्यालयांचा गैरवापर भारतातील चैतन्यशील लोकशाहीला कधीही मजबूत करू शकणार नाही. मला आशा आहे की, तुम्ही मान्य कराल की, भिन्न विचारधारा आणि अनेक राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीच्या हृदयाचे ठोके आहेत. त्याचप्रमाणे, कायद्याचे राज्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य हे आपल्या न्यायव्यवस्थेचे कोनशिला आहेत. त्यामुळे मनीष सिसोदिया यांची बिनशर्त सुटका करावी, असे आवाहन मी तुम्हाला करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.