आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये दोन खासगी बस, दोन कटेंनर आणि 2 कारचा समावेश होता. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृताची ओळख पटू शकली नाही. परंतू आरसी बुकनुसार वाहन चेन्नईतील नांगनाल्लूरचे होते. सद्या या प्रकरणाचा तपास पोलिस करित आहेत.
पुलाचे बांधकाम सुरू असल्याने अपघात
त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर सद्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहने हळू चालविण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान, आज सकाळी हा अपघात झाला. दरम्यान, कुड्डालोरचे एसपी शक्ती गणेशन सध्या अपघातस्थळी तपास करत आहेत.
नववर्षाच्या पहिल्या दिवशीही झाला होता अपघात
नववर्षाची पहाट उजाडत नाही तोच कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला होता. हा अपघात गोव्याहून गोकर्णाकडे निघालेल्या बसला झाला होता. यात तामिळनाडूतील चार जणांचा मृत्यू झाला होता. अरूण पांडियन, विपुल, मोहम्मद आणि शेखरन अशी चार मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्या अन्य एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.