आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tamil Nadu Assembly Election 2021 | Actor Kamal Haasan Attacked, Makkal Nidhi Maiam Chief Kamal Haasan, Makkal Nidhi Maiam (MNM), Poll Campaigning In Tamil Nadu

तामिळनाडू विधानसभा निवडणूक:प्रचारानंतर चेन्नईकडे येत असताना कमल हसन यांच्या कारवर हल्ला, कार्यकर्त्यांकडून हल्लेखोराला चोप

चेन्नईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोयंबटूर दक्षिणमधून कमल हसन मैदानात

मक्कल निधि मैयम (MNM) पक्षाचे प्रमुख अभिनेते कमल हसन यांच्या कारवर रविवारी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हसन कांचीपुरममध्ये निवडणुकीच्या प्रचारानंतर चेन्नईकडे येत होते, तेव्हा एका तरुणाने कथितरित्या त्यांच्या कारवर हल्ला केला. यात कमल हसन यांना कुठलीच इजा झाली नसून, कारचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला ताब्यात घेतले.

मद्यधुंद अवस्थेत होता तरुण

पक्षाने दावा केला आहे की, हल्ला करणाऱ्या तरुणाने दारू पिलेली होती आणि त्याला कमल हसन यांना जवळून पाहायचे होते. त्यामुळेच, त्याने कारच्या काचेवर हल्ला केला. त्याच्या या हल्ल्यात कारच्या विंडस्क्रीनचे नुकसान झाले आहे.

कोयंबटूर दक्षिणमधून कमल हसन मैदानात

कमल हसन 6 एप्रिलला होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोयंबटूर दक्षिण विधानसभा मतदानर संघातून निवडणूक लढवत आहेत. कमल हसन यांनी शुक्रवारी आपल्या पक्षाच्या 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत आपल्या उमेदवारीची घोषणा केली. त्यांच्या यादीत जेष्ठ नेते पाझा करुप्पैया आणि अभिनेत्री श्रीप्रिया यांच्या नावाचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...