आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tamil Nadu BJP Leader Audio Controversy Trichy Surya Siva Suspended, Latest News And Update

सूर्या शिवा, डेजी सरण BJPतून निलंबित:ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षाची कारवाई; सर्वच पदांवरून 6 महिन्यांसाठी गच्छंती

चेन्नई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही एकमेकांची माफी मागिलती आहे. पण त्यानंतरही आमचे विरोधक या प्रकरणी विनाकारण तामिळनाडू भाजप प्रदेशांवर टीका करत आहेत, असा दावा सूर्या शिवा व डेजी सरण यांनी केला आहे.  - Divya Marathi
आम्ही एकमेकांची माफी मागिलती आहे. पण त्यानंतरही आमचे विरोधक या प्रकरणी विनाकारण तामिळनाडू भाजप प्रदेशांवर टीका करत आहेत, असा दावा सूर्या शिवा व डेजी सरण यांनी केला आहे. 

तामिळनाडू भाजपने आपल्या राज्याचे ओबीसी विंगचे नेते सूर्या शिवा व अल्पसंख्यक विंगच्या प्रमुख महिला नेत्या डेजी सरण यांची त्यांच्या पदांवरू 6 महिन्यांसाठी उचलबांगडी करण्यात आली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, या दोघांची एक ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात शिवा पार्टी कॅडर म्हणून काम करू शकतात.

ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

ऑडिओ क्लिपमध्ये सूर्या शिवा कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत. त्यात ते डेसी सरण यांना घाबरवण्यासाठी गुंड पाठवण्याची व त्यांचे गुप्तांग कापून मरीना बीचवर फेकून देण्याची भाषा करताना ऐकू येत आहेत. त्यांची अश्लिल शिवीगाळही यात ऐकू येत आहे.

प्रकरण सोडवल्याचा दावा

दोघेही गुरुवारी पक्षाच्या शिस्तपालन समितीपुढे हजर झाले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सूर्या शिवा म्हणाले की, प्रकरण निकाली काढण्यात आले. आम्ही एकमेकांची माफी मागितली. ऑडिओ आम्ही लीक केला नव्हता. डेजी सरण माझ्या चांगल्या कौटुंबिक मित्र आहेत. पण आमचे विरोधक या प्रकरणी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना विनाकारण लक्ष करत आहेत. डेसी सरन म्हणाले की, विरोधक या मुद्याला विनाकारण सनसनाटी बनवत आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकला.

शिवा द्रमुकचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा यांचे सुपुत्र आहेत. गत मे महिन्यात ते भाजपत सहभागी झाले होते.
शिवा द्रमुकचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा यांचे सुपुत्र आहेत. गत मे महिन्यात ते भाजपत सहभागी झाले होते.

स्पष्टीकरण दिल्यानंतरही निलंबन

ऑडिओ क्लिपविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतरही पक्षाने या दोन्ही नेत्यांवर निलंबनाची कारवाई केली. अन्नामलाई यांनी सांगितले की, पक्ष दुसऱ्या पक्षांसारखा हे प्रकरण असेच सोडणार नाही. निलंबन काळात शिवा यांना पक्ष कार्यकर्ते म्हणून काम करता येईल. त्यांच्या वर्तनात समाधानकारक सुधारणा झाली व आमचा विश्वास बसला तर संपूर्ण जबाबदारी त्यांना परत केली जाईल.

भाजप महिला कार्यकर्तीचा आक्षेपार्ह व्हिडिओ कॉल व्हायरल

भाजपतील ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वीच भाजप सरचिटणीस के टी राघवन यांनी एका भाजप महिला कार्यकर्तीला केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. पक्षाने केलेल्या चौकशीत काहीच स्पष्ट झाले नाही. त्यानंतरही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अन्नामलाई त्यानंतर म्हणाले होते की, सदर महिला तक्रार देण्यासाठी पुढे आली नाही.

BJP नेत्या खुशबू सुंदर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी

काही आठवड्यांपूर्वीच द्रमुक नेते सादिक अली यांनी भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. खुशबू सुंदर यांनीही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या म्हणाल्या होत्या - भाजप महिलांचा देवी म्हणून सन्मान करते. आम्ही याकडे डोळेझाक करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...