आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tamil Nadu Chennai Rain Updates, Holiday Declared For Schools, Colleges In 7 Districts, 2 Dead

चेन्नईत मुसळधार पावसात दोघांचा मृत्यू:30 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; 7 जिल्ह्यांतील शाळा बंद

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी चेन्नई आणि त्याच्या लगतच्या भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. उत्तर चेन्नईमध्ये विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एका महिलेला इमारतीखाली दबून आपला जीव गमवावा लागला. तामिळनाडू सरकारने बुधवारी सकाळी चेन्नई, तिरुवल्लूर आणि रानीपेट जिल्ह्यांसह 7 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली.

चेन्नईतील रस्त्यांवर असे पाणी साचले आहे.
चेन्नईतील रस्त्यांवर असे पाणी साचले आहे.

चेन्नईच्या पावसाने 30 वर्षांचा विक्रम मोडला

गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच चेन्नईत 1 नोव्हेंबरला एवढा पाऊस झाला. त्याचवेळी, गेल्या 72 वर्षांतील हा तिसरा सर्वाधिक पाऊस आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासांत 8 सेमी (80 मिमी) पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 1 नोव्हेंबर 1990 रोजी चेन्नईमध्ये 13 सेंटिमीटर पाऊस पडला होता. त्याआधी 1964 मध्ये याच तारखेला 11 सेमी पाऊस पडला होता.

राज्यात 19 ऑक्टोबरपासून पाऊस सुरू

ईशान्य मान्सून 19 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचला आणि 30 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यात पसरला. चेन्नई हवामान विभागाचे प्रमुख एस. बालचंदर यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये सध्या 1 सेमी ते 9 सेमीदरम्यान पाऊस पडत आहे. त्यात कावेरी नदीचा डेल्टा आणि किनारी भागांचाही समावेश होतो.

शहरात आणखी दोन दिवस पाऊस पडेल. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बालचंदर म्हणाले की, सध्या आपण सक्रिय मान्सून पाहत आहोत. या हंगामात बरेच बदल होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...