आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tamil Nadu Chennai Minor Girl Forced To Sell Her Eggs To Private Hospitals, Case Registered

आईनेच केला मुलीच्या गर्भाशयाचा सौदा:महिलेने मित्राला करायला लावला अल्पवयीन मुलीवर रेप, 4 वर्षांत 8 वेळा स्त्रीबीजांची विक्री

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूमध्ये एका आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार करायला लावला आणि नंतर तिच्या स्त्रीबीजांचा सौदा केला. हे प्रकरण सालेम जिल्ह्यातील आहे. या अल्पवयीन मुलीवर आधी तिच्या आईच्या पुरुष मित्राने बलात्कार केला आणि नंतर तिचे स्त्रीबीज हॉस्पिटलमध्ये विकल्याचे तपासात समोर आले आहे. बलात्कार पीडितेची आई आणि तिच्या पुरुष मित्राला अटक करण्यात आली आहे.

या मुलीवर बलात्कार करून तिचे स्त्रीबीज विकण्याचा प्रकार 2017 पासून सुरू होता, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती. गेल्या 4 वर्षांत 8 पेक्षा जास्त वेळा तिच्या गर्भाचा सौदा करण्यात आला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी मुलीशी बोलून समुपदेशन सुरू केले.

रुग्णालयात 20 हजार रुपयांना विकत होते स्त्रीबीज

पीडितेने सांगितले की, प्रत्येक वेळी ती गरोदर राहिली की तिला स्त्रीबीज विकून हॉस्पिटलमधून 20 हजार रुपये मिळत असत. यातील 5 हजार रुपये एक महिला कमिशन म्हणून घ्यायची आणि उर्वरित रक्कम आई आणि तिचा मित्र ठेवायचा. असे वर्षातून दोनदा केले जात होते.

आईच तिच्या पुरुष मित्राला पोटच्या मुलीवर बलात्कार करायला लावायची, गरोदर असताना तिचे स्त्रीबीज हॉस्पिटलमध्ये विकायची.
आईच तिच्या पुरुष मित्राला पोटच्या मुलीवर बलात्कार करायला लावायची, गरोदर असताना तिचे स्त्रीबीज हॉस्पिटलमध्ये विकायची.

पीडितेच्या तक्रारीवरून कारवाई

पीडितेचे आई-वडील 10 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते, त्यानंतर ती तिच्या आईसोबत तिच्या पुरुष मित्राच्या घरी राहत होती. अनेक वर्षांपासून अत्याचार सहन करत असलेली ही मुलगी मे महिन्यात घरातून पळून आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. मुलीने हा प्रकार एका मैत्रिणीला सांगितला, त्यानंतर तिच्या मैत्रिणी आणि काही नातेवाईकांनी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची आई आणि तिच्या पुरुष मित्राला अटक केली आहे.

राज्य सरकारने चौकशीसाठी नेमली समिती

राज्याच्या आरोग्य सचिवांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत, आयपीसीच्या कलम 420, 464, 41, 506 (ii) पॉक्सो कायदा, आधारचा गैरवापर यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वंध्यत्वाच्या वाढत्या प्रकरणांचा अँगलदेखील तपासला जाईल. या प्रकरणात काही डॉक्टर आणि दलालांची ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...