आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Tamil Nadu Elections 2021 (Coronavirus) Update; DMK MK Stalin Party Supporters Celebrate Outside Party Headquarters In Chennai; News And Live Udpates

विजयात कोरोना नियमांचे विसर:बंगालमध्ये रस्त्यावर फटाके फोडले, चेन्नईतील जमावांना लाडूचे वाटप; आयोगाचे संबंधित लोकांवर एफआयआर दाखल करण्याचे राज्यांना निर्देश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • मतमोजणी रोखण्याचा इशारा कोर्टाने दिला होता

देशात आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. परंतु, संबंधित पक्षांतील कार्यकर्त्यांकडून विजयाचे सुपर स्प्रेडर उत्सव सुरु आहे. दरम्यान, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा टिएमसी पक्ष आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडले आहे.

तर दुसरीकडे, तामिळनाडूची राजधानी चैन्नईतदेखील डीएमके कार्यलयासमोर कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला आहे. दरम्यान, जमांवामध्ये लोकांना लाडूचे वाटप करण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संबंधित लोकांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश राज्य मुख्य सचिवांना दिले आहेत.

चैन्नईत डीएमके कार्यलयासमोर कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला
चैन्नईत डीएमके कार्यलयासमोर कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला

बंगालमध्ये विना मास्क रस्त्यावर गर्दी
देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकारांना कोरोनाला रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या राज्यात लोक विना मास्क रस्त्यावर येत गर्दी करत आहे. विशेष म्हणजे बंगालमध्ये टिएमसी पक्ष आघाडीवर असल्याने कार्यकर्ते रस्त्यावर येऊन फटाके फोडत विजय साजरा करत आहे.

मतमोजणी रोखण्याचा इशारा कोर्टाने दिला होता
कोरोनाच्या बिघडलेल्या परिस्थिती दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला फटकारले होते. सरन्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. 2 मे रोजी मतमोजणीच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल बनवण्यात यावेत आणि त्याचे पालन व्हावे. असे झाले नाही तर आम्हाला मतमोजणी पुढे ढकलावी लागेल.

मतमोजणीविषयी हायकोर्टाच्या सहा प्रतिक्रिया

 • मतमोजणीच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल लागू झाला आहे याची खात्री करा.
 • मोजणीचा दिवस कोणत्याही किंमतीवर राजकीय किंवा गैर-राजकीय कारणांमुळे कोरोना वाढवण्यास जबाबदार असू नये.
 • एकतर मोजणी योग्य पद्धतीने व्हावी किंवा ती पुढे ढकलली जावी.
 • लोकांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. प्रशासनाला याची आठवण करून द्यायला हवी आहे ही वाईट गोष्ट आहे.
 • जेव्हा नागरिक जिवंत राहतील, तेव्हाच त्यांना या लोकशाही प्रजासत्ताकात जे हक्क मिळाले त्याचा उपयोग करण्यास ते सक्षम असतील.
 • आजच्या परिस्थिती म्हणजे जिवंत राहणे आणि लोकांना जिवंत ठेवणे अशी आहे, इतर सर्व गोष्टी या नंतर येतात.
बातम्या आणखी आहेत...