आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांना DMK प्रवक्ते शिवाजी कृष्णमूर्ती यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
शिवाजी कृष्णमूर्ती यांनी राज्यपालांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही काश्मीरमध्ये जा, आम्ही तिथे एका दहशतवाद्याला पाठवू, जो तुम्हाला गोळ्या घालेल.
एका कार्यक्रमात राज्यपालांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वगळले होते. तेव्हापासून सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते राज्यपालांना विरोध करत आहेत. शिवाजी कृष्णमूर्ती यांच्या वक्तव्याबाबत राज्यपाल कार्यालयाने त्यांच्याविरुद्ध चेन्नई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले द्रमुक नेते?
द्रमुक नेते शिवाजी कृष्णमृती म्हणाले की, ' आम्ही राज्यपालांना काहीही बोलू नये, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. राज्यपालांनी भाषण नीट वाचले असते, तर मी त्यांच्या पायावर फुले वाहिले असते. त्यांचे हात जोडून आभार मानले असते. पण, तामिळनाडूतील या व्यक्तीने डॉ. आंबेडकरांचे नाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे मला त्याला चप्पलने मारण्याचा अधिकार नाही का?'
पुढे शिवाजी कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की, 'तुम्ही संविधानाच्या नावाने शपथ घेतली ना? आंबेडकरांनी हे संविधान लिहिले नाही का? तुम्ही आंबेडकरांचे नाव घेण्यास नकार देत असाल तर तुम्ही काश्मीरला जा. आम्ही तिथे एका दहशतवाद्याला पाठवू जो तुम्हाला गोळ्या घालून ठार करेल.
भाजपचा सवाल - डीएमकेचे कोणत्या दहशतवाद्यांशी संबंध?
द्रमुक नेत्याच्या या वक्तव्याबाबत भाजप नेते नारायणन तिरुपती यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांचे दहशतवादी संबंध पोलिसांनी शोधले पाहिजेत, असे तिरुपती म्हणाले. पुढे तिरुपती म्हणाले, आम्ही तुम्हाला मारण्यासाठी दहशतवादी पाठवू, या वाक्यातील 'आम्ही'चा अर्थ काय? ही भाषा फक्त शिवाजी कृष्णमूर्तींनी वापरली असेल असे वाटत नाही. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या आश्रयाने अशी भाषा वापरली जात आहे असे मला वाटते.
राज्यपालांना विरोध का?
9 जानेवारी रोजी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांचे विधानसभेत भाषण झाले. सरकारने तयार केलेल्या भाषणातील काही भाग त्यांनी वाचला नाही. त्याऐवजी, त्यांनी भाषणात आपल्या बाजूने काही गोष्टी जोडल्या. राज्यपालांच्या भाषणातील बदलाविरोधात मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत ठराव मांडला. त्यानंतर राज्यपालांनी कामकाज अर्धवट सोडले. यानंतर गेट आऊट रवी ट्विटरवर ट्रेंड होत आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.