आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडू सरकारमधील मंत्री एसएम नसीर यांनी द्रमुक कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दुग्धव्यवसाय मंत्री एस. एम. नासर हे तिरुवल्लूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांवर दगडफेक करताना दिसत आहेत.
खुर्ची आणायला उशीर झाल्याने संताप
मंत्री एस. एम. नसीर यांना बसण्यासाठी खुर्ची आणण्यास पक्षाच्या कार्यकर्त्याने उशीर केला होता. त्यामुळे मंत्री संतप्त झाले आणि त्यांनी कामगारावर दगडफेक केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सात सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एसएम नासर मोकळ्या जागेवर उभे आहेत. त्यांच्या मागे काही लोक उभे असलेले दिसतात.
मंत्र्यानेच कार्यकर्त्यांवर भिरकावले दगडफेक
वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एसएम नासर तिरुवल्लूरमधील एका कार्यक्रमात द्रमुक कार्यकर्त्यांवर दगडफेक करताना दिसत आहेत. दुग्धव्यवसाय मंत्री नासर हे त्यांच्या मतदारसंघात खूप सक्रिय आहेत. मंत्र्याच्या अशा वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना ट्रोलही केले जात आहे. नासर यांनी मागील विधानसभा निवडणूक आवाडी मतदारसंघातून लढवून पंडियाराजन यांचा पराभव केला होता.
नासर यापूर्वीही होते चर्चेत
एस.एम. नासर हे तेच मंत्री आहेत जे केंद्र सरकारने दुधावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लादल्याची चुकीची माहिती पसरवून गेल्या वर्षी चर्चेत आले होते. दुधावर जीएसटी लागू केल्याने दुधाचे भाव वाढले असल्याचे ते म्हणाले होते. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी मंत्र्यांच्या विधानावर जोरदार टीका केली आणि हे अज्ञान असल्याचे म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.