आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत महिलेने केली प्रियकराची हत्या:बहाण्याने बोलावले, मित्रांसह मिळून केला खून; मृतदेहाचे तुकडे करून 400 किमी अंतरावर पुरले

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयंतनची बहीण मद्रास उच्च न्यायालयात वकील आहे, तिने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. - Divya Marathi
जयंतनची बहीण मद्रास उच्च न्यायालयात वकील आहे, तिने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

चेन्नईतील पुदुकोट्टई येथे भाग्यलक्ष्मी नावाच्या महिलेने तिचा प्रियकर जयंतनला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. नंतर मित्रांसोबत मिळून त्याची हत्या केली. आरोपींनी मृतदेहाचे तुकडेही केले. हे तुकडे पुरण्यासाठी सर्वजण 400 किमी दूर असलेल्या कोवलम बीचवर गेले होते.

जयंतनच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा त्याचे लोकेशन आणि कॉल डिटेल्सवरून भाग्यलक्ष्मीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांच्या चौकशीत तिने हत्या करून मृतदेह पुरल्याची बाब मान्य केली आहे. उर्वरित आरोपी फरार आहेत.

जयंतनच्या हत्येचा घटनाक्रम...

जयंतन 2020 मध्ये भाग्यलक्ष्मीला भेटला : मृत एम. जयंतन चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थाई एअरवेजमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करत होता. 28 वर्षीय भाग्यलक्ष्मी ही सेक्स वर्कर आहे. 2020 मध्ये तांबरम येथील एका लॉजवर ती पहिल्यांदा जयंतनला भेटली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते.

18 मार्चला भेटायला बोलावले, पैशाच्या व्यवहारावरून वाद : भाग्यलक्ष्मीने 18 मार्च रोजी जयंतनला पुदुकोट्टाईला भेटायला बोलावले. त्यानंतर जयंतनने त्याची बहीण पी. जयकरुबा हिला फोन केला आणि सांगितले की, तो त्याच्या मूळ गावी विल्लुपुरमला जात आहे. जयंतन थेट भाग्यलक्ष्मीकडे गेला. येथे पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला.

भाग्यलक्ष्मीने मित्रांना बोलावून मारले : वाद वाढत असताना भाग्यलक्ष्मीने तिचा मित्र शंकरला बोलावले, जो त्याच्यासोबत आणखी 2 साथीदारांना घेऊन आला. नंतर चौघांनी मिळून जयंतची क्रूरपणे हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून पॉलिथिनमध्ये पॅक केले. 20 मार्च रोजी शंकर आणि त्याच्यासोबत हात-पायांचे तुकडे असलेली पिशवी घेऊन कोवलम येथे गेले आणि तेथे एका निर्जन ठिकाणी ते सर्व पुरले.

भाग्यलक्ष्मी 6 दिवसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेली : जयंतचा मृतदेह 6 दिवस ठेवल्यानंतर भाग्यलक्ष्मीने 26 मार्च रोजी कॅब बुक केली. तिनेही कोवलम गाठले आणि ते तुकडे वाळूत पुरले. मंदिराच्या एका पुजाऱ्यानेही त्यांना या कामात मदत केली.

21 मार्च रोजी बहिणीने केली बेपत्ता झाल्याची नोंद : जयंतनचा फोन बंद असल्याने त्याच्या बहिणीने 21 मार्च रोजी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी भाग्यलक्ष्मीला अटक केली. जिथे त्याने खुनाची कबुली दिली. मात्र, त्याला साथ देणारे उर्वरित आरोपी फरार आहेत.

या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळाली नाहीत

भाग्यलक्ष्मीला पकडल्यानंतर पोलिसांनी जयंतनचा माग काढला, मात्र त्याचा खून का करण्यात आला हे समजू शकले नाही. त्याचवेळी या सर्वांनी जयंतनच्या मृतदेहाचे तुकडे पुरण्यासाठी 400 किमी दूर असलेल्या कोवलमची निवड का केली हेही गूढ उकलू शकलेले नाही.

गुन्ह्यांशी संबंधित याही बातम्या वाचा...

वकिलाची हत्या, LIVE VIDEO:वकिल पळत होते, मारेकरी मागे लागले; पोट अन् छातीवर चाकूने वार त्यानंतर दगडाने डोके ठेचले

जोधपूरमधील 55 वर्षीय वकील जुगराज चौहान हत्या प्रकरणात रविवारी आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वकील जीव वाचविण्यासाठी पळत होते तर मारेकरी त्यांचे चुलत भाऊ त्यांच्यामागे धावताना दिसत आहे. खाली पाडून छाती आणि पोटावर चाकूने सतत वार करत आहे. त्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचतात. यावरून वकिलाच्या हत्येचा कट समोर आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

प्लास्टिक बॅगमध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे:मुलीने अनेक महिने कोंडून ठेवले, नंतर खून केला : पोलिसांना संशय

मुंबईतील लालबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळला आहे. महिलेचा भाऊ आणि पुतण्याने काही दिवसांपूर्वी काळाचौकी पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिस शोधासाठी महिलेच्या घरी पोहोचले. दरम्यान, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात, पाय काही भाग कापलेले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी

मैदानावर रक्तपात:नो-बॉल दिल्यामुळे अंपायरची हत्या, ओडिशातील फ्रेंडली मॅचमध्ये घडली घटना; 4 आरोपींना अटक

ओडिशाच्या कटक येथे रविवारी एका फ्रेंडली सामन्यात अंपायरची निर्घृण हत्या करण्यात आली. सामना खेळणाऱ्या खेळाडूंनी अंपायरिंग करणाऱ्या लकी राऊत नामक 22 वर्षीय तरुणाला बॅट व चाकूने भोसकून ठार मारले. लकीने एक बॉल नो बॉल घोषित केला होता. त्याला खेळाडूंनी विरोध दर्शवला. त्यानंतर वाद एवढा वाढला की, खेळाडूंनी थेट अंपायरिंग करणाऱ्या लकीवरच हल्ला चढवला. येथे वाचा संपूर्ण बातमी

यूपीत मुलीच्या अब्रूसाठी बापाने केली हत्या:प्रियकर सौरभला आधी दारू पाजली, मग फावड्याने शिर केले धडावेगळे​​​​​​​

उत्तर प्रदेशात एका बापाने आपल्या मुलीच्या अब्रूसाठी तुरुंगात जाणे पसंत केले. मुलीचे लग्न महिनाभरापूर्वी निश्चित झाले होते. लवकरच तिची विदाई होणार होती. पण कुटुंबाच्या सन्मानासाठी वडिलांनी हात रक्ताने माखण्याचा निर्णय घेतला. ही घटना ग्रामीण बरेलीच्या सिरौली पोलीस स्टेशन हद्दीतील धनैरा गौरी गावातील आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी