आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tamil Nadu Plant Blast | Tamil Nadu Neyveli Lignite Power Plant Boiler Explosion Accident Today, Fire Tenders Were Rushed To The Spot

तमिळनाडु:नेयवेली पॉवर प्लँटमध्ये बॉयलरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तमिळनाडुच्या नेयवेली पॉवर प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. 

तमिळनाडुच्या कुड्डालोर जिल्ह्यात ही घटना घडली. हा स्फोट तमिळनाडुची राजधानी चेन्नईपासून 180 किलोमीटर दूर एनएलसी इंडिया लिमिटेडच्या पॉवर प्‍लँटमध्ये घडली. 

पॉवर प्लँटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "बॉयलर बंद होते. आम्ही घटनेची चौकशी करणार आहोत." दरम्यान, मागील दोन महिन्यातील हा दुसरा स्फोट आहे. यापूर्वी मे महिन्यात झालेल्या स्फोटात आठ कर्मचारी जखमी झाले होते.

प्लँटमध्ये 27 हजार कर्मचारी काम करतात

या प्लँटमध्ये एकूण 3940 मेगावाट विजेची निर्मिती होते. ज्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला, तिथे 1470 मेगावाट विजेचे उत्पादन केले जाते. एनएलसीमध्ये 27 हजार कर्मचारी काम करतात.

0