आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:सुप्रीम कोर्टाकडून तामिळनाडूत संघाच्या माेर्चाला परवानगी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मोर्चाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने संघाला राज्यात मोर्चे काढण्याची परवानगी दिली होती. न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना सांगितले की, निरोगी लोकशाहीमध्ये विरोधी आंदोलन आवश्यक आहे. तामिळनाडू सरकारकडून अॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.