आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तामिळनाडूच्या विरुद्धनगरच्या एका फटाक्याच्या कारखान्यात दुपारी आग लागली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर होरपळल्यामुळे 36 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनुसार, केमिकल मिक्स करताना ही आग लागली. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जेथे काही लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
केंद्र-राज्य सरकारने भरपाईची केली घोषणा
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंब्यांना प्राइम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडमधून 2-2 लाख आणि गंभीर जखमींना 50-50 हजारांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तर तामिळनाडू सरकारकडूनही मृतांच्या कुटुंबियांना 3-3 लाख आणि गंभीर जखमींना 1-1 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
मदुरैमध्ये 4 महिन्यांपूर्वी अशाच एका अपघातात 5 लोकांचा मृत्यू झाला होता
गेल्यावर्षी अक्टोबरमध्ये मदुरैमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्ये 3 महिलांसह 5 लोकांचा मृत्यू झाला होता. तपासामध्ये कळाले होते की, केमिकल मिक्स करताना ही आग लागली होती. ज्यामुळे एकामागोमाग एक स्फोट झाले आणि लोकांची जीव गेले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.