आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्व लडाखच्या दौलतबेग अोल्डी (डीबीओ) आणि देपसांग परिसरात चीनने १७ हजार जवान आणि चिलखती वाहने तैनात केल्याच्या वृत्तानंतर भारतीय लष्करही जोरदार प्रत्युत्तराच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार, पूर्व लडाखमध्ये टी-९० रणगाड्यांचे रेजिमेंट चिनी लष्कराच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यास सज्ज आहे. वृत्तसंस्थेने म्हटले, या दोन्ही भागात पीएलएच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी काराकोर्रम दरीजवळ पेट्रोलिंग पॉइंट १ पासून देपसांग प्लेन्सपर्यंत रणगाड्यांची रेजिमेंट तैनात आहे.
या भागात चीनचे १७ हजार जवान आहेत. त्यांनीच भारतीय जवानांना पीपी-१० व पीपी-१३ मध्ये गस्त घालण्यापासून रोखले हाेते. चीनचे डीबीओ व डेपसांग येथे बांधकाम सुरू करण्यापूर्वी या संपूर्ण प्रदेशाची निगराणी माउंटन ब्रिगेड व चिलखती ब्रिगेडद्वारे केली जात होती. आता येथे १५ हजार जवान व अनेक रणगाडे रेजिमेंटकडे तैनातीसाठी रवाना झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.